Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणक्याच्या आरोग्याबद्दल का वाढत आहेत गैरसमजूती? याबद्दल जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली सविस्तर माहिती

हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे मणक्यांच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत आहे. मणक्याच्या आजाराची लागण झाल्यानंतर पाठदुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2025 | 03:41 PM
मणक्याच्या आरोग्याबद्दलच्या का वाढत आहेत गैरसमजूती?

मणक्याच्या आरोग्याबद्दलच्या का वाढत आहेत गैरसमजूती?

Follow Us
Close
Follow Us:

अनेक लोकांना असे वाटते की वय झाले की पाठदुखी ही होतेच आणि पाठदुखी झालीच तर त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन ती बरी देखील होते. हे केवळ गैरसमज आहेत जे कसलाही विलंब न करता दूर करणे गरजेचे आहे. या गैरसमजूतींमुळे वेळीच उपचारास विलंब होतो आणि भविष्यातील गुंतागुंत वाढते. पाठीच्या आणि मणक्याच्या समस्या चुकीच्या शारीरीक स्थितीत फार काळ बसणे आणि व्यायामाचा अभाव यासारख्या विविध चिंताजनक घटकांमुळे पाठदुखीच्या समस्या सामान्यपणे आढळून येतात. खरंतर प्रत्येकाने मणक्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्याबाबत असलेल्या गैरसमजूती दूर करुन त्यामागची वास्तविकता जाणून घेतली पाहिजे. याबद्दल डॉ. बुरहान सलीम सियामवाला, स्पाइन सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Blood Sugar राहील कायमच नियंत्रणात! भात शिजवताना घाला ‘हे’ पदार्थ, शरीरात चुकूनही वाढणार नाही डायबिटीज

काय आहेत गैरसमजुती?

पाठदुखी ही वयोवृध्दांमधील एक सामान्य समस्या आहे

वास्तविकता : मणक्याच्या समस्या या वयानुसार अधिक सामान्य वाटत असल्या तरी त्अतुक व्यवस्थापनाने त्या टाळता येऊ शकतात. व्यायामादरम्यान झालेल्या दुखापती किंवा अपघात, लठ्ठपणा किंवा जड वस्तू उचलण्याचे चुकीचे तंत्र यामुळे अनेक लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य शारीरीक मुद्रा आणि वेळीच व्यवस्थापन करून वृद्धापकाळातही तुमचा पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक राहू शकतो.

विश्रांती घेणे हा पाठदुखीचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे

वास्तविकता : दीर्घकाळ बेड रेस्टमुळे तुमच्या पाठीचा कणा आणखी कमकुवत होऊ शकतो आणि बरे होण्यास विलंब होऊ शकतो. सौम्य हालचाली, स्ट्रेचिंग आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी केल्यास जलद बरे होता येते स्नायुंचा कडकपणा कमी करण्यास मदत होते. फिजिओथेरपी हा उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याकडे रुग्णांनी दुर्लक्ष करु नये, कारण ते पाठीचा कणा मजबूत राखण्यास मदत करते.

जड वस्तू उचलणे हे पाठदुखीचे एकमेव कारण आहे

वास्तविकता : चुकीच शारीरीक स्थिती, कमकुवत स्नायू आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे यामुळे देखील पाठदुखीची समस्या होऊ शकते. या कारणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. म्हणून, जड वस्तू उचलताना योग्य तंत्राचा वापर करणे आणि योग्य शारीरीक स्थिती राखणे गरजेचे आहे.

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन, कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची कशी काळजी घ्यावी

दीर्घकालीन पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.

वास्तविकता : मणक्याच्या समस्या हे योग्य औषधोपचार, फिजिओथेरपी, शारीरीक स्थिती सुधारणे आणि अचूक बदलांनी देखील व्यवस्थापित करू शकता. तज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करणे आणि पौष्टिक आहाराच्या सेवनाने देखील ही स्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते. शस्त्रक्रिया ही केवळ मज्जातंतूवर येणारा दाब किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये आवश्यक आहे, कारण या समस्या एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्या वर परिणाम करतात. त्यामुळे घाबरू नका आणि वेळीच उपचार करा.

Web Title: Why are there growing misconceptions about spine health know the detailed information given by the doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय
1

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय

Blood Circulation मध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या उपचार
2

Blood Circulation मध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या उपचार

Calcium Deficiency: महिलांमध्ये का वाढत आहे कॅल्शियमची कमतरता? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
3

Calcium Deficiency: महिलांमध्ये का वाढत आहे कॅल्शियमची कमतरता? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी
4

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.