महाभारतातील 'कर्ण' पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन
काही वर्षांपूर्वी हिंदी टेलिव्हिजनवर महाभारत मालिका खूप गाजली होती. अजूनही लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच महाभारत मालिका खूप आवडीने पहिली जाते. याच महाभारतात कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. काही वर्षांपूर्वी पंकज यांना कॅन्सरची लागण झाली होती. उपचारानंतर ते कॅन्सर मुक्त झाले होते. पण कालांतराने पुन्हा एकदा त्यांच्या शरीरात कॅन्सरचा धोका वाढला. या आजारामुळे त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. पण अखेर त्यांचा मृत्यू झाला. पंकज यांच्या अचानक जाण्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांमध्ये सुद्धा दुःखाचे वातावरण आहे. त्यांनी बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या प्रसिद्ध मालिकेत कर्णाची भूमिका साकारली होती आणि प्रत्येक घराघरात ते फेमस झाले. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी शरीराला पोषण आहाराची आणि पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते. आहारात लसूण, भरपूर फळे, पालेभाज्या, सुका मेवा इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या पेशी तयार होत नाहीत. तसेच आहारात कॅलरीज, फॅट्स आणि साखर असलेल्या पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. भरपूर पाण्याच्या सेवनामुळे मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊन जातो.आहारात लाल मांस आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.
हल्ली सर्वच वयोगटातील लोक तंबाखू, दारू, सिगारेट इत्यादी अंमली पदार्थाचे सेवन करतात. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे धूम्रपान किंवा दारू, सिगारेटचे अजिबात सेवन करू नये. वारंवार दारू किंवा तंबाखू खाल्ल्यास स्तन, आतडे आणि यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. आहारात अतिप्रमाणात जंक फूडचे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे पोट आणि आतड्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे काहीवेळा शरीराला कॅन्सरची लागण होते. त्यामुळे दिवसभरात ३० मिनिटं वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी काढावा. व्यायाम, ध्यान, प्राणायाम इत्यादी गोष्टी केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहते. याशिवाय शरीराला विश्रांती देण्यासाठी ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी.