
कमी वयात मुलींना मासिक पाळी का येते? जीवनशैलीतील 'या' चुकीच्या सवयींचा आरोग्यावर लगेच दिसून येतो परिणाम
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराचा विकास, जीवनशैली, अन्नाची गुणवत्ता, मानसिक आरोग्यन बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतो. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमी वयात मुलींना मासिक पाळी का येते? लवकर मासिक पाळी येण्यास कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चुकीच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
वयाच्या ८ किंवा ९ वर्षात मासिक पाळी येणे हे खूप जास्त भीतीदायक आहे. यामुळे मुली मानसिक तणावात जाण्याची शक्यता असते. लहान वयात शरीरात होणारे बदल लवकर समजून येत नाहीत. यामुळे सामाजिक व भावनिक गुंतागुंती निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. लवकर मासिक पाळी येणे हा कोणताही आजार नसून शरीरात निर्माण होणाऱ्या बदलांचा परिणाम आहे. शरीरात अचानक दिसून येणाऱ्या बदलांमुळे आणि शरीराच्या अवयवांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे काहीवेळा मुली खूप जास्त गोंधळून जातात.
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अतिप्रमाणात जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता, पॅक्ड स्नॅक्स आणि साखरेचे अति सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात जास्त फॅट वाढते. या फॅटचा परिणाम हार्मोनल बॅलन्सवर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच आहारात फळे, पालेभाज्या इत्यादी पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे आवश्यक आहे. हार्मोन्सच्या असंतुलनचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. वाढलेल्या वजनामुळे पीसीओडीसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
मासिक पाळी म्हणजे काय?
मासिक पाळी हा एक नैसर्गिक शारीरिक बदल आहे जो वयात येताना सुरू होतो.गर्भधारणेसाठी गर्भाशयाचे अस्तर दर महिन्याला जाड होते आणि गर्भधारणा न झाल्यास हे अस्तर रक्ताच्या स्वरूपात योनीमार्गे बाहेर पडते, ज्याला मासिक पाळी म्हणतात.
मासिक पाळीमध्ये काय करावे?
स्वच्छता राखा आणि आवश्यकतेनुसार पॅड/टॅम्पोन बदला.वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे किंवा घरगुती उपाय वापरू शकता.शरीराची काळजी घेण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि पुरेसा आराम करा.
मासिक पाळी न येण्याची कारणे?
हार्मोन्समधील असंतुलन, जास्त व्यायाम, किंवा हार्मोनल गर्भनिरोधक वापरणे ही काही कारणे असू शकतात. व्यायाम आणि आहारातील बदलांमुळेही यात फरक पडू शकतो.