Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात का वाढतो डायरियाचा धोका? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या आरोग्याची काळजी, बिघणार नाही तब्येत

पावसाळ्यात वेगाने पसरणारा आजार म्हणजे डायरिया. यामुळे सतत पोटात दुखणे,पेटके, मळमळ आणि उलट्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. या आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2025 | 05:30 AM
पावसाळ्यात का वाढतो डायरियाचा धोका?

पावसाळ्यात का वाढतो डायरियाचा धोका?

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. बाहेरील दूषित पाणी, रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ, जंक फूडचे अतिसेवन, मसालेदार तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात तेलकट तिखट पदार्थांचे सेवन न करता शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांच्या सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य कायमच निरोगी राहील.(फोटो सौजन्य – istock)

युरीन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ-वेदना होतील दूर

पावसाळ्यात वातावरणात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, दूषित पाणी इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. डेंग्यू, मलेरिया, डायरिया इत्यादी आजारांची लागण झाल्यानंतर शरीर अतिशय कमकुवत होऊन जाते. डायरिया आणि कॉलरासारखे गंभीर आजार आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे पसरतात. डासांची पैसाद मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर साथीचे आजार वाढू लागतात. अस्वच्छतेमुळे डायरियासारखे गंभीर आजार वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डायरियापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास आजारांपासून तुम्ही लांब राहाल.

हात स्वच्छ धुवणे:

कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर कुठेही फिरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. अस्वच्छ हातांमुळे विषाणू थेट तोंडात जातात. ज्यामुळे डायरिया किंवा इतर साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणाआधी कमीत कमी २० सेकंड हात पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे हातांवर जमा झालेले डायरिया किंवा इतर आजारांचे विषाणू नष्ट होऊन जातात.

स्वच्छ पाण्याचे सेवन:

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण पावसाळयाच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने पाणी उकळवून प्यावे. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहते. डायरिया आणि जुलाब होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे दूषित पाणी. कोणत्याही ठिकाणावरील पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात घाणेरडे विषाणू जातात. ज्यामुळे पोटात दुखणे, जुलाब, उलट्या किंवा इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

फळे भाज्या चांगल्या स्वच्छ कराव्यात:

निरोगी आरोग्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीर कायमच निरोगी राहते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारातून विकत आणलेल्या भाज्या काहीवेळ मिठाच्या पाण्यात टाकून ठेवाव्यात. यामुळे भाज्यांवरील आणि फळांवरील विषाणू नष्ट होतील.

पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी प्या ‘हे’ प्रभावी पाणी, कोलेस्ट्रॉल- मधुमेहापासून होईल कायमची सुटका

FAQs (डायरियासंबंधित प्रश्न)

अतिसार म्हणजे काय?

अतिसार म्हणजे वारंवार पातळ किंवा पाण्यासारखे जुलाब होणे. यात पोटात दुखणे किंवा पेटके येऊ शकतात.

अतिसाराची लक्षणे कोणती?

अतिसाराची मुख्य लक्षणे आहेत: वारंवार पातळ किंवा पाण्यासारखे मल होणे, पोटदुखी किंवा पेटके, मळमळ आणि उलट्या, निर्जलीकरण (शरीरात पाण्याची कमतरता).

अतिसारावर काय उपचार करावे?

निर्जलीकरण टाळण्यासाठी भरपूर पाणी, ORS (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) किंवा स्वच्छ सूप प्या. जर अतिसार जास्त दिवस टिकला किंवा तीव्र झाला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why does diarrhea risk increase during monsoon follow these tips to stay healthy and avoid illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • monsoon care

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.