पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी प्या 'हे' प्रभावी पाणी
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. याशिवाय शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागल्यास शरीराला हानी पोहचते. नेहमीच पॅकिंग पदार्थ किंवा शरीरास हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक नकारात्मक बदल दिसून येतात. हे बदल योग्य वेळी ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेले महागडे डाएट प्लॅन्स घेतात. मात्र तरीसुद्धा पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवनांवर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून वेगवेगळे प्रोटीनशेक, सॅलड किंवा अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र या पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरावर कोणताच परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली साखर, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या सुद्धा दूर होईल.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी मेथी, ओवा, बडिशेप आणि दालचिनी मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. याशिवाय तुम्ही पचनक्रिया मजबूत राहते. शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी ओवा, बडीशेप, धणे, दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. या पाण्याच्या सेवनामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो.
जगभरात मधुमेहाने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तात साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेह वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर कमीत कमी गोड आणि तेलकट पदार्थ खावे. याशिवाय आहारात घरगुती पेयांचे सेवन करावे. मेथी, ओवा, बडिशेप आणि दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील आणि शरीराचे कार्य सुधारेल.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू लागतो. शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित मेथी, ओवा, बडिशेप आणि दालचिनीचे पाणी प्यावे. यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
प्रथिने, फायबर आणि कमी चरबी असलेले पदार्थ खा.
वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यावे?
दररोज पुरेसे पाणी प्या.साधारणपणे 8-10 ग्लास पाणी प्याण्याचा सल्ला दिला जातो.
वजन कमी करण्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे?
चांगली झोप घेणे आवश्यक आहे. दररोज 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी चांगले असते.