Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लेडच्या मध्ये असणारा ‘तो’ आकार का! जाणून घ्या ‘किंग जिलेट’ चा १०० वर्षांपूर्वीचा क्रांतिकारी शोध!

ब्लेडच्या मध्यभागातील कट हा सुरुवातीला १९०१ मधील जिलेट रेझरमध्ये फिट होण्यासाठी बनवला गेला होता, जो पुढे जागतिक मानक बनला आणि यामुळेच ब्लेडला शेव्हिंग करताना तुटण्यापासून वाचवणारी लवचिकता मिळते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 29, 2026 | 12:08 AM
ब्लेडच्या मध्ये असणारा ‘तो’ आकार का! जाणून घ्या ‘किंग जिलेट’ चा १०० वर्षांपूर्वीचा क्रांतिकारी शोध!
Follow Us
Follow Us:

आपण सर्वांनी कधी ना कधी शेव्हिंगचे ब्लेड नक्कीच पाहिले असणार. वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्लेड बाजारात मिळतात, पण तुम्ही कधी बारकाईने पाहिले आहे का? कंपनी कोणतीही असो, प्रत्येक ब्लेडच्या अगदी मध्यभागी एक विशिष्ट आकाराची नक्षी किंवा कट असतो. विशेष म्हणजे, गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ हा आकार अजिबात बदललेला नाही.सर्व कंपन्या एकाच डिझाइनचे ब्लेड का बनवतात आणि त्यामध्ये तो कट का असतो? यामागे एक इंटरेस्टिंग इतिहास आणि सायन्सचा मास्टरस्ट्रोक दडला आहे.

किंग कॅम्प जिलेट यांचा तो क्रांतीकारी शोध

याची सुरुवात झाली सन १९०१ मध्ये, जेव्हा अमेरिकेतील किंग कॅम्प जिलेट यांनी त्यांचे सहकारी विल्यम निकर्सन यांच्यासोबत मिळवून पहिल्यांदा ‘सेफ्टी रेझर’ आणि पातळ ब्लेडचा शोध लावला. त्या काळात पुरुष वस्तऱ्याने दाढी करायचे, ज्याने गाल कापण्याचा धोका असायचा. जिलेट यांनी हा धोका ओळखून रेझर बनवले.

त्या काळी जिलेट कंपनीने ज्या रेझरचे पेटंट घेतले होते, त्या रेझरच्या वरच्या भागात ब्लेड घट्ट बसवण्यासाठी तीन स्क्रू किंवा छोटे बॉल्स असायचे. त्यामुळे ब्लेड रेझरमध्ये अचूक लॉक व्हावे, म्हणून ब्लेडच्या मध्यभागी तशाच आकाराचा कट देण्यात आला.

‘वाघ-बकरी’ चहाच्या मागची ही क्रेझी स्टोरी माहितीय का तुम्हाला? फक्त ब्रँड नाही, तर सामाजिक क्रांती आहे आहे हा ‘वाघ-बकरी’ चहा!

इतर कंपन्यांची एन्ट्री आणि जिलेटची मक्तेदारी

जिलेटचे हे डिझाइन प्रचंड गाजले. सुरुवातीला जिलेटने स्वतःच्या डिझाइनचे पेटंट २५ वर्षांसाठी सुरक्षित ठेवले होते. पण जेव्हा हे पेटंट संपले, तेव्हा इतर कंपन्यांनीही ब्लेड बनवण्यास सुरुवात केली.

आता इतर कंपन्यांसमोर एक मोठी अडचण होती. त्या काळात बाजारात फक्त ‘जिलेट’ कंपनीचेच रेझर विकले जायचे. जर नवीन कंपन्यांनी वेगळ्या डिझाइनचे ब्लेड बनवले असते, तर ते जिलेटच्या रेझरमध्ये बसले नसते. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची ब्लेड खरेदीच केली नसती. हा व्यावसायिक तोटा टाळण्यासाठी, सर्व कंपन्यांनी जिलेटचेच डिझाइन कॉपी करण्याचा निर्णय घेतला आणि रेझरमध्ये फिट बसेल असाच कट आपल्या ब्लेडमध्ये ठेवला. पुढे जाऊन हेच डिझाइन ग्लोबल स्टँडर्ड बनले.

घराचा पाया ठरवताना मातीची चाचणी का महत्त्वाची? वेगवेगळ्या मातीनुसार फाउंडेशनची खोली आणि खोदकामाचे नियम; आत्ताच समजून घ्या

डिझाइनमागील कारण- फ्लेक्सिबिलिटी

ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या या आकाराचा केवळ इतिहासच नाही, तर एक महत्त्वाचा वैज्ञानिक फायदाही आहे.

दाब नियंत्रित करणे: ब्लेड अत्यंत पातळ आणि धारदार धातूपासून बनवले जाते. जर ते पूर्णपणे सपाट  ठेवले, तर शेव्हिंग करताना त्यावर थोडाही दाब पडल्यास ते मधोमध कडकन तुटून जाईल.

लवचिकता वाढवणे: मध्यभागी हा विशिष्ट कट असल्यामुळे ब्लेडला कमालीची लवचिकता मिळते. जेव्हा आपण रेझरचा स्क्रू घट्ट करतो, तेव्हा हे ब्लेड किंचित लवले जाते, पण तुटत नाही. हा आकार ब्लेडवर पडणारा ताण सर्व बाजूंनी समान पद्धतीने विभागून घेतो.

आज बाजारात शेव्हिंगचे नवनवीन तंत्रज्ञान आणि ट्रिमर्स आले असले, तरी जुन्या ब्लेडचे हे डिझाइन आजही जगभर जसेच्या तसे वापरले जाते. एकाच वेळी व्यावसायिक हुशारी आणि विज्ञानाचा अचूक मेळ कसा घालता येतो, याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणायला हवे.

Web Title: Why does gillatte blade has cut inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:08 AM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

अरेच्चा! घरांचा आकार चौकोनी यासाठी असतो तर! खोल्यांचा आकार चौरस असण्यामध्ये दडलीय पैशांची आणि जागेची बचत!
1

अरेच्चा! घरांचा आकार चौकोनी यासाठी असतो तर! खोल्यांचा आकार चौरस असण्यामध्ये दडलीय पैशांची आणि जागेची बचत!

कंदील आणि डमरू घेऊन भल्या पहाटे यायचा हा ‘पिंगळा’! भविष्य सांगायचा,उपदेश करायचा आणि दिस उजडायच्या आधी निघून जायचा!
2

कंदील आणि डमरू घेऊन भल्या पहाटे यायचा हा ‘पिंगळा’! भविष्य सांगायचा,उपदेश करायचा आणि दिस उजडायच्या आधी निघून जायचा!

‘हेळवे’! तुमच्या वंशावळीचे राखणदार; पिढ्यानपिढ्यांचा इतिहास जपणारी महाराष्ट्रातील परंपरा
3

‘हेळवे’! तुमच्या वंशावळीचे राखणदार; पिढ्यानपिढ्यांचा इतिहास जपणारी महाराष्ट्रातील परंपरा

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!
4

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.