Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!

Rice Storage Tips: तांदूळ एअरटाइट डब्यात ठेवूनही त्यामध्ये छोटे किडे किंवा घुन दिसण्यामागे एक महत्त्वाचे कारण असू शकते. तांदूळ घरात आणण्यापूर्वीच त्यामध्ये कीटकांची सूक्ष्म अंडी असण्याची शक्यता असते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 28, 2026 | 06:20 PM
Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तांदळात आधीपासूनच कीटकांची सूक्ष्म अंडी असू शकतात
  • उबदारपणा आणि ओलाव्यामुळे अंड्यांतून किडे तयार होऊ शकतात
  • एअरटाइट डबा असूनही तांदळात कीड पडण्याची शक्यता असते.
तांदूळ घरात आणल्यानंतर तो खराब होऊ नये म्हणून आपण तो व्यवस्थित धुऊन, कोरड्या डब्यात भरून ठेवतो. डब्याचं झाकणही घट्ट लावतो. पण काही दिवसांनी डबा उघडला की त्यात छोटे किडे किंवा घुन दिसतात आणि मग साहजिकच प्रश्न पडतो, डबा तर बंद होता, मग हे किडे आत आले कुठून?

खरं तर प्रत्येक वेळी हे किडे बाहेरून डब्यात शिरलेले असतातच असं नाही. तांदूळ साठवण्यापूर्वीच त्यामध्ये कीटकांची अतिशय बारीक अंडी असण्याची शक्यता असते. ही अंडी इतकी सूक्ष्म असतात की साध्या नजरेने त्यांचा अंदाजही येत नाही. Rice Storage Tips:

तांदळात किडे तयार होण्याची सुरुवात कशी होते?

तांदूळ शेतातून काढल्यानंतर तो गोदामात किंवा इतर ठिकाणी काही काळ साठवला जातो. या काळात काही कीटक दाण्यांवर अंडी घालू शकतात. दाण्यांचा आकार आणि अंड्यांचा अतिशय छोटा आकार यामुळे ती सहज लक्षात येत नाहीत. नंतर हाच तांदूळ पॅक होऊन आपल्या घरात येतो. आपण तो एअरटाइट डब्यात भरून ठेवतो. डब्याच्या आतलं वातावरण उबदार असेल आणि थोडा ओलावा असेल, तर आधीपासून असलेल्या अंड्यांमधून पुढे कीटक तयार होऊ शकतात. म्हणूनच डबा बंद असूनही अचानक तांदळामध्ये किडे दिसतात. बाहेरून किडे आले आहेत असं वाटत असलं, तरी त्यांची सुरुवात तांदूळ साठवण्याच्या आधीच झालेली असू शकते.

तांदूळ साठवताना या गोष्टी करून पाहा

किडे होऊ नयेत यासाठी घरात काही पारंपरिक उपाय केले जातात. मात्र हे उपाय प्रत्येक वेळी पूर्णपणे परिणामकारक ठरतीलच असं नाही. तरीही योग्य साठवणूक आणि स्वच्छता यामुळे समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

कडुलिंबाची पाने:
सुकलेली कडुलिंबाची काही पाने तांदळाच्या डब्यात ठेवण्याची पद्धत अनेक घरांमध्ये वापरली जाते. कडुलिंबाचा वास काही कीटकांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो.

सुक्या मिरच्या:
तांदळामध्ये काही सुक्या लाल मिरच्या ठेवण्याचाही घरगुती उपाय केला जातो. मिरचीचा वास कीटकांना अप्रिय वाटतो, त्यामुळे त्यांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

लवंग आणि तमालपत्र:
काही जण तांदळाच्या डब्यात लवंग किंवा तमालपत्र ठेवतात. या मसाल्यांचा सुगंध धान्यातील कीटकांना दूर ठेवण्यासाठी वापरला जातो.

अख्खा लसूण:
सोललेला नसलेला लसूणही काही घरांमध्ये धान्याच्या डब्यात ठेवला जातो. मात्र तो ओलसर किंवा खराब झाल्यास लगेच काढून टाकावा.

कर्करोगाविरोधातील लढ्याला नवी दिशा! HNCII च्या देशव्यापी मोहिमेची गोरखपूरमधून सुरुवात

फ्रिजमध्ये ठेवण्याचा उपाय

नवीन तांदूळ आणल्यानंतर तो थोड्या काळासाठी फ्रिजमध्ये ठेवण्याचा उपायही केला जातो. थंड तापमानामुळे दाण्यांमध्ये आधीपासून असलेल्या काही कीटकांच्या अंड्यांची वाढ थांबण्यास किंवा त्यांची हालचाल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर तांदूळ बाहेर काढून पूर्णपणे कोरड्या स्थितीत साठवणे महत्त्वाचे आहे.

डबा कोरडा ठेवणं सर्वात महत्त्वाचं

तांदूळ ठेवण्यापूर्वी डबा स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडा आहे का, हे नक्की पाहा. डब्यामध्ये पाण्याचा किंवा ओलाव्याचा अंश राहिल्यास धान्य खराब होण्याची शक्यता वाढते.

तसंच खूप जुना तांदूळ आणि नवीन तांदूळ एकत्र करण्याऐवजी शक्यतो जुना साठा संपल्यानंतर डबा स्वच्छ करून त्यात नवीन तांदूळ भरावा. डबा अधूनमधून तपासल्यास सुरुवातीलाच काही बदल दिसत आहेत का, हे लक्षात येतं.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाची खरेदी अजूनही बाकी? Myntra M – Now वर 30 मिनिटात मिळतील Gifts

तांदळाच्या डब्यात किडे होऊ नयेत यासाठी केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता स्वच्छ, कोरडी आणि योग्य साठवणूक करणे महत्त्वाचे आहे. थोडी काळजी घेतली तर रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा तांदूळ अधिक काळ चांगल्या स्थितीत ठेवता येऊ शकतो.

Web Title: Why does rice get infested with pests even when stored in an airtight container find out the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • lifestlye tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral
1

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
2

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई
3

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Heat and Air Pollution: गरमीसोबत वाढतंय प्रदूषणाचं संकट! दमा आणि त्वचेच्या आजारांपासून सावध राहा
4

Heat and Air Pollution: गरमीसोबत वाढतंय प्रदूषणाचं संकट! दमा आणि त्वचेच्या आजारांपासून सावध राहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.