Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : जगाला हादरवणाऱ्या उपासमारीच्या हत्याकांडाचा निकाल आला ; ३० जण हत्या प्रकरणात दोषी

Breaking News : केनियातील शाकाहोला जंगलातील सामूहिक मृत्यू प्रकरणात न्यायालयाने पॉल मॅकेन्झीसह सुमारे ३० जणांना हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. स्वर्गात जाण्याच्या नावाखाली अनुयायांना उपाशी ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात १९० मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला असून, ४०० हून अधिक मृतदेह सापडले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 19, 2026 | 10:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • स्वर्गात जाण्याच्या नावाखाली उपवासाचा आदेश
  • शाकाहोला जंगलात ४०० हून अधिक मृतदेह
  • तीन वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निकाल
Breaking News :जगाला हादरवणाऱ्या केनियातील शाकाहोला जंगलातील सामूहिक मृत्यू प्रकरणात अखेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. धार्मिक शिकवणीच्या नावाखाली अनुयायांना उपाशी राहण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेला स्वयंघोषित धर्मगुरू पॉल मॅकेन्झी आणि त्याच्या इतर सुमारे ३० साथीदारांना हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात १९० मुलांसह एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अलीकडच्या काळातील पंथाशी संबंधित सर्वांत भीषण घटनांपैकी ही एक मानली जात आहे.

स्वर्गात जाण्याच्या नावाखाली उपवासाचा आदेश

केनियातील पॉल मॅकेन्झी हा गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचा प्रमुख होता. त्याने आपल्या अनुयायांना जगाचा अंत जवळ आल्याचे सांगितले होते. स्वर्गात जाण्यासाठी अन्न-पाणी त्यागणे आवश्यक असल्याचे तो आपल्या अनुयायांना सांगत असल्याचा आरोप होता. त्याच्या धार्मिक शिकवणीच्या प्रभावाखाली अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांनाही उपाशी ठेवले. इतकेच नव्हे, तर मुलांना शाळेत पाठवणे आणि आजारी पडल्यास रुग्णालयात नेणे चुकीचे असल्याचेही सांगितले जात होते. या शिकवणीमुळे अनेक निष्पाप मुलांचे जीव गेल्याचे तपासात समोर आले.

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर

शाकाहोला जंगलात ४०० हून अधिक मृतदेह

२०२३ मध्ये केनियाच्या किनारपट्टीवरील किलिफी परगण्यात असलेल्या शाकाहोला जंगलातून या भीषण घटनेचा उलगडा झाला. पोलिसांना जंगलात सामूहिक कबरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

आतापर्यंत या परिसरातून ४०० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. अनेक मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले. न्यायालयातील सध्याच्या खटल्यात १९० मुले आणि एका प्रौढ व्यक्तीच्या मृत्यूचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण केनियासह आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला होता.

Gaza News : पैसा नाही ,मदत कशी करणार? संयुक्त राष्ट्राकडे पैसे नाहीत ;५ लाख पॅलेस्टानी उपाशी मारणार

तीन वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निकाल

या प्रकरणात पॉल मॅकेन्झी आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र, न्यायालयाने सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतर मॅकेन्झीसह इतर सुमारे ३० जणांना हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले.

न्यायाधीशांनी मुलांना अन्नापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या घटनांचाही उल्लेख केला. या निकालामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. दोषींना किती शिक्षा सुनावली जाणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने शिक्षेची सुनावणी ६ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.

Web Title: Breaking news verdict delivered in the starvation massacre that shocked the world 30 individuals found guilty of murder cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 10:16 PM

Topics:  

  • Africa Continent
  • Breaking News
  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

USA News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय ;महिलांच्या आरोग्यसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष टास्क फोर्स
1

USA News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय ;महिलांच्या आरोग्यसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष टास्क फोर्स

France News : आमच्या देशातील उद्रेकाला मध्यपूर्वेतील युद्ध जबाबदार ; फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन
2

France News : आमच्या देशातील उद्रेकाला मध्यपूर्वेतील युद्ध जबाबदार ; फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर
3

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर

Scam 2024: विद्या मालवडेची मायक्रोड्रामाच्या दुनियेत एन्ट्री; ‘स्कॅम २०२४’मधून उलगडणार सायबर फसवणुकीचं रहस्य
4

Scam 2024: विद्या मालवडेची मायक्रोड्रामाच्या दुनियेत एन्ट्री; ‘स्कॅम २०२४’मधून उलगडणार सायबर फसवणुकीचं रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.