'म्युकस फिशिंग सिंड्रोम' म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास दृष्टीवर होऊ शकतो परिणाम
शरीरातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे डोळे. जो प्रकाश ग्रहण करून वस्तूंचे रंगरूप दाखवतो आणि आपल्याला जग पाहण्यास मदत करते. डोळ्यांच्या आतमध्ये कॉर्निया, भिंग आणि रेटिना यांसारख्या नाजूक अवयव असतात. पण वारंवार मोबाईल, लॅपटॉपआणि स्क्रीन पाहत राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी खराब होऊन जाते. याशिवाय डोळ्यांसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टिवैषम्य यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. डोळ्यांवर जास्तीचा तणाव निर्माण झाल्यानंतर डोळ्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांच्या बोळ्यांच्या कोपऱ्यात दिसतो. जिला डोळ्यातली घाण आपण समजतो तिलाच वैद्यकीय भाषेत म्यूकस म्हणतात. बहुतेक जण हा पदार्थ घाण समजून बोटांनी किंवा टिश्यूने काढून टाकतात. पण ही घाण रोजच साचत असल्यामुळे सतत डोळे चोळले जातात. मात्र या सवयीमुळे डोळ्यांच्या आरोग्याला दीर्घकाळासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
सोशल मीडियावर आरोग्यविषयक माहिती देणारे अमेरिकेतील डॉक्टर कुणाल सूद यांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांतून वारंवार चिकट पदार्थ काढण्याच्या सवयीला ‘म्यूकस फिशिंग सिंड्रोम’ म्हणतात. ही कृती वरवर साधी आणि निरुपद्रवी वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती डोळ्यांना हळूहळू नुकसान पोहोचवू शकते.
डोळ्यांचा पृष्ठभाग खूपच नाजूक असतो, जेव्हा आपण बोटांनी किंवा नखांनी हा चिकट धाग्यासारखा म्यूकस काढतो, तेव्हा डोळ्यांच्या वरच्या थरावर सूक्ष्म ओरखडे पडू शकतात. यामुळे डोळ्यांत जळजळ, खाज आणि सूज वाढते. शरीर या त्रासाला प्रतिसाद म्हणून अधिक म्यूकस तयार करू लागते. परिणामी पुन्हा तो काढण्याची सवय लागते आणि हा त्रासदायक चक्र सुरू होतं.
बहुतेकांना हे माहीत नसते, पण डोळ्यांतील हा चिकट पदार्थ घाण नसून संरक्षणात्मक कवच असतो. डोळे सतत पाणी, तेल आणि म्यूकस यांचे संतुलित मिश्रण तयार करत असतात. ही पातळ परत डोळे ओलसर ठेवते, धूळ, माती आणि जंतू बाहेर काढण्यास मदत करते. सकाळी दिसणारी पपडी म्हणजे रात्रीच्या वेळेत सुकलेले अश्रू आणि मृत पेशी असतात, ज्यामुळे डोळे स्वच्छ राहतात.
डॉ. सूद यांच्या मते, वारंवार डोळे कुरतडल्यास कॉर्नियाला गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे ससर्गाचा धोका वाढतोच, शिवाय काही प्रकरणांत दृष्टी धूसर होणे किंवा कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यताही नाकारता यंत येत नाही. म्हणूनच डोळ्यांत साचलेला म्यूकस सतत काढण्याऐवजी डोळ्यांची स्वच्छता योग्य पद्धतीने राखणे आणि त्रास जास्त असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Ans: गाजर, रताळे, भोपळा, पपई, सॅल्मन, ट्यूना सारखे मासे.
Ans: मोतीबिंदू , काचबिंदू , दृष्टिदोष
Ans: हानिकारक UV किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करतात






