
Apple A Day Keeps- Doctor Away, या म्हणीतून स्वताची महती सांगणारे हे लालचुटुक गोड फळ आपली एक वेगळीच आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. इंग्रजीत ‘ॲपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फळाला आपण मराठीत ‘सफरचंद’ म्हणतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की एका फळाच्या नावात ‘सफर’ म्हणजे ‘प्रवास’ आणि ‘चंद’ म्हणजे चंद्र हे दोन शब्द एकत्र आले तरी कसे आले? यामागे खूप इंटरेस्टिंग, मनोरंजक आणि ऐतिहासिक प्रवास दडला आहे.
‘सफरचंद’ची सफर
सफरचंद हे मूळचे महाराष्ट्रातील किंवा भारतातील फळ नाही. मध्य आशिया आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशसारख्या थंड प्रदेशात हे फळ मोठ्या प्रमाणात उगवते. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा व्यापारी मध्य आशियातून आणि पर्शियातून (आजचे इराण) भारतात व्यापारासाठी यायचे, तेव्हा ते सोबत हे फळ घेऊन येत असत.
दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय
पार्शियन भाषेत ‘सेब’ किंवा ‘सेफ’ म्हणजे सफरचंद. प्राचीन काळात जेव्हा व्यापारी घोड्यांवर आणि उंटांवर माल लादून हजारो मैलांचा खडतर प्रवास करून म्हणजे ‘सफर करून’ हे फळ भारतात आणत असत, तेव्हा या प्रवासावरून या फळाची ओळख बनू लागली. दूरवरून ‘सफर’ करून आलेले फळ म्हणून लोकांच्या तोंडी हा शब्द बसत गेला.
पण मग यात ‘चंद‘ कसा आला?
पार्शियन भाषेतील ‘सेफर’ किंवा ‘सेफ-रंग’ या शब्दाचा उच्चार भारतीय भाषांमध्ये स्वीकारताना थोडा बदलला. प्राचीन मराठी आणि गुजराती भाषिक व्यापाऱ्यांनी या फळाचा आकार आणि सौंदर्य पाहिले. हे फळ गोल, चमकदार आणि दिसायला पौर्णिमेच्या चंद्रासारखे सुंदर आणि लोभसवाणे दिसते म्हणून, पार्शियन भाषेतील ‘सेफर’, त्याच्या लांबच्या प्रासावरून ‘सफर’ आणि त्याचा चंद्रासारखा गोल आकार दर्शवणारा ‘चंद’ हे दोन शब्द एकत्र येऊन ‘सफरचंद’ हा नवीन शब्द तयार झाला.
अंड्यांमध्ये कोणकोणते मायक्रोन्युट्रीएंट असतात? आणि ते शरीरासाठी कसे महत्त्वाचे असतात? जाणून घ्या
काही भाषा तज्ज्ञांच्या मते, अरबी आणि पार्शियन भाषेत प्रवासादरम्यान टिकणाऱ्या आणि ताजे राहणाऱ्या फळाला ‘सफर-जला’ किंवा ‘सफर-जंद’ असेही म्हटले जायचे. हाच शब्द पुढे मराठी भाषेत सुटसुटीत होऊन ‘सफरचंद’ बनला.
अशा प्रकारे एका दूरच्या देशातून जहाजे आणि उंटांच्या तांड्यावरून प्रवास करत महाराष्ट्रात पोहोचलेल्या या फळाला मराठी माणसाने केवळ आपलेसे केले नाही, तर त्याच्या ऐतिहासिक प्रवासाची आणि सौंदर्याची साक्ष देणारे ‘सफरचंद’ हे सुंदर नावही दिले!