
मकरसंक्रांती सणाला हळदीकुंकू का दिले जाते? कसं करायचं हळदीकुंकू?
कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्येतर महिलांकडून आर्य महिलानी आपल्याकडे घेतली आहे. जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहती त्यात लाल रंगाला विशेष महत्त्व पाहिला मिळते. इ.स. च्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचे उल्लेख आहे. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या श्रृंगारशतकात कुकमतिलकाला विशेष महत्त्व होतं. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात पाहिला मिळते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य अधिक असून सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय होते. कुंकू सौभाग्यचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभकार्यात वापर करण्यात येत आहे. स्त्रियांचं कुंकू हे लेणे मानले गेले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरू झाली. सुवासिनी घरातून बाहेर घडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’ अनेक सण, समारंभात हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात. पण संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदीकुंकूवाला अधिक महत्त्व आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
हळदीकुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे, त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदीकुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करावी. सुहासिनी महिलेला हळदीकुंकू लावून त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लीत करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरुन सुहासिनी सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या. वाण देताना पदराचा टोकाने ते दिले पाहिजे. तीळगूळ देऊन नमस्कार करा. नववधूने पाच वर्ष हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करावा.
हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे.
वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार घेऊन वाण देतात. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे.
वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते, हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते.
मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील महत्व
प्रत्येक सुवासिनी महिला संक्रातीमध्ये हळदीकुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रातीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील गोडवादेखील जपतो.