
दारू न पिणाऱ्यांमध्ये का वाढत आहे Liver cancer चा धोका? जीवनशैलीत केलेल्या 'या' बदलांमुळे लिव्हरवरील चरबी होईल नष्ट
तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचा धोका कशामुळे वाढतो?
फॅटी लिव्हरची लक्षणे?
फॅटी लिव्हरवर घरगुती उपाय?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षांनंतर आजार व्हायचे. पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शारीरिक हालचालींचा अभाव, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन किंवा वारंवार जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. तरुणांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लिव्हरच्या आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी
जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे किशोरावस्थेतील मुलांमध्ये सुद्धा आजारांचा प्रमाण वाढले आहे. लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे यांसारखी पन्नासपेक्षा जास्त कामे लिव्हर करते. दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होते, असे सगळ्यांचं वाटते. पण दारूचे सेवन न करता सुद्धा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढला आहे. जंक फूड, गोड पेये, प्रक्रिया केलेले स्नॅक्स आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सच्या अतिसेवनामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
लठ्ठपणा, अनावश्यक वाढलेले वजन, तासनतास एका जागेवर बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, व्यायाम न करणे, मधुमेह इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शारीरिक हालचालींचा अभाव, तासनतास स्क्रीन पाहणे, अपुरी झोप, ताणतणाव आणि अनुवंशिकता इत्यादी गोष्टी लिव्हरचे आजार होण्यास कारणीभूत ठरतात. पोटावरील लठ्ठपणा, टाईप-२ मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब किंवा पीसीओएस सारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या तरुणांमध्ये लिव्हरच्या आजारांचा धोका वाढतो.
सतत थकवा आणि अशक्तपणा.
पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात जडपणा किंवा अस्वस्थता वाटणे
पोटात हलकी सूज येणे.
त्वचा, डोळे आणि नखं पिवळी पडणे.
झपाट्याने वजन कमी होणे.
रक्ताची उलटी होणे किंवा मानसिक गोंधळ उडणे.
लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी केवळ आहारात बदल न करता जीवनशैलीत बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात भाजी, ताजी फळे, पालेभाज्या, कडधान्ये, मासे, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, बदाम आणि वेगवेगळ्या बियांचे सेवन करावे. याशिवाय लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. गोड पेये, मिठाई, पांढरी ब्रेड, बेकरी उत्पादने, तळलेले पदार्थ, अतिप्रक्रिया केलेले अन्न आणि रेड मीट इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. हे पदार्थ केवळ लिव्हरच्या आरोग्यासाठी नाहीतर संपूर्ण शरीरासाठी धोकादायक आहेत.
Ans: होय. दारूचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींनाही लिव्हर कॅन्सरचा धोका असू शकतो.
Ans: अयोग्य आहार, जास्त वजन, व्यायामाचा अभाव, जास्त साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन, तसेच मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टन्स यामुळे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ शकते.
Ans: वजन नियंत्रित ठेवणे, नियमित व्यायाम करणे, भाज्या-फळे, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्त संतुलित आहार घेणे आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे उपयुक्त ठरू शकते.