
हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
थंडीत किडनी स्टोन का होतो?
किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे?
किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी किती पाणी प्यावे?
राज्यभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडत आहे. थंड वातावरणात आरोग्यासंबंधित अनेक जीवघेण्या समस्या उद्भवतात.हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सर्दी, खोकला, कफ इत्यादी अनेक समस्या उद्भवल्यानंतर शरीराला हानी पोहचते. तसेच हिवाळ्यात लघवीसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू शकतात. कारण थंड वातावरणामुळे जास्त तहान लागत नाही. खूप कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाते. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित गंभीर आजार होतात. थंडीत किडनी स्टोनची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे शरीरात गंभीर बदल होतात. हे बदल कालांतराने गंभीर आजारांचे कारण बनतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये किडनी स्टोनचा धोका का वाढतो? किडनी स्टोनची लक्षणे आणि यावर नेमके कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणात गारवा वाढल्यानंतर शरीराला खूप कमी घाम येतो. तसेच जास्त पाणी पिण्याची इच्छा होत नाही. दिवसभरात खूप कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाते. कमी पाण्याच्या सेवनामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. थंडीमध्ये कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीर डिहायड्रेट होऊन लघवीसंबंधित आजार, थकवा, अशक्तपणा वाढून शरीराला हानी पोहचते.किडनी शरीरातील मिनरल्स फिल्टर करण्याचे काम करते. पण पाण्याच्या कमतरतेमुळे कॅल्शियम आणि यूरिक ऍसिड क्रिस्टलमध्ये बदलतात, ज्याचे रूपांतर किडनी स्टोनमध्ये होते. किडनीमध्ये तयार झालेल्या स्टोनमुळे काहींना अशक्तपणा जाणवू लागतो.
किडनी स्टोन झाल्यांनतर किंवा होऊ नये म्हणून नियमित २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे किडनीला रक्त फिल्टर करताना कोणतेही अडथळे येत नाहीत. याशिवाय किडनीचे कार्य सुरळीत चालू राहते. पाण्याच्या सेवनामुळे किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीर हायड्रेट राहिल्यास किडनी मिनरल्स व्यवस्थित फिल्टर करते. तसेच आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. अतिमीठाचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. साखर आणि कोल्ड-ड्रिंक्सचे वारंवार सेवन करू नये. या पेयांच्या अतिसेवनामुळे किडनीला धोका निर्माण होतो.
Ans: मुतखडा हा मूत्रपिंडात (kidney) तयार होणारा खनिजे आणि क्षारांचा घट्ट गोळा असतो.
Ans: पाठ किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, पुरुषांमध्ये वेदना मांडीच्या भागात पसरू शकते.
Ans: पुरेसे पाणी पिणे (दिवसातून ८-१० ग्लास) महत्त्वाचे आहे.