मासिक पाळीत पोटात वाढलेल्या असह्य वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा कोरफडचे सेवन
कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध
प्रत्येक घरात एक तरी कोरफडचे झाड असते. कोरफडचा वापर आरोग्य आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. काहींना नियमित चेहऱ्यावर कोरफड जेल लावण्याची सवय असते. कोरफड जेल त्वचा उजळदार करण्यासोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. सर्दी खोकला किंवा कफ झाल्यानंतर लहान मुलांना कोरफडचा रस काढून पिण्यास दिला जातो. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
तरुण मुलींना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप त्रास होतो. हा त्रास वाढल्यानंतर कोणत्याही पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन कारण्याऐवजी कोरफडच्या रसाचे सेवन करावे. पीसीओडी, पीसीओएस असलेल्या मुलींना मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडच्या रसाचे सेवन करावे. कोरफडचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड स्वच्छ धुवून त्यातील पिवळा चिकट थर निघून जाईपर्यंत कोरफड उभी करून ठेवा. त्यानंतर कोरफडीच्या आतील गर काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेला रस उपाशी पोटी प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
उपाशी पोटी कोरफडच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण कोरफडच्या रसाचे सेवन केल्यास महिनाभरात वाढलेले वजन कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. कोरफडचा रस आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतो.
Ans: मासिक पाळी म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरातून होणारा मासिक रक्तस्त्राव.
Ans: ओटीपोटात आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात.
Ans: मासिक पाळी साधारणपणे 3 ते 7 दिवस टिकते.






