पाण्याच्या मदतीने सहज फुटेल नारळ, जोर लावायचीही गरज नाही; फक्त ही ट्रिक फॉलो करा
आपल्या स्वयंपाकघरात अनेक असे पदार्थ असतात ज्यांचा आपल्या घरात नियमित किंवा अधिकतरवेळी वापर केला जातो. असाच एक पदार्थ म्हणजे नारळ. नारळापासून अनेक पदार्थ बनवता येतात आणि अनेक भाज्यांमध्येही याचा वापर केला जातो ज्यामुळे स्वयंपाकघरात याला विशेष स्थान! नारळ चवीला चांगला असला तरी याला फोडणं मात्र फार कठीण आहे. नारळ फोडताना फार मेहनत घ्यावी लागते आणि अनेक प्रयत्नानंतर तो योग्यरीत्या आपल्या कवचातून बाहेर येतो. अशात आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने नारळाचा सहज फोडून बाहेर काढता येऊ शकतं.
मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबवर @CookWithSangi या चॅनेलवर नारळ फोडण्याची एक सोपी पद्धत सांगण्यात आली आहे जिचा वापर करून आपण कोणत्याही मेहनतीशिवाय अगदी झटपट नारळ त्याच्या कवचातून बाहेर काढू शकतो. ही पद्धत प्रत्येक घरातील गृहिणींना कामाची ठरणार आहे त्यामुळे अजूनही ही ट्रेक ट्राय केली नसेल तर आजच हिला घरी करून पहा.
नारळ फोडण्याची सोपी पद्धत
नारळ फोडण्यासाठी सर्वप्रथम त्यावर पाण्याने नारळावर एक आडवी रेष तयार करा. यानंतर खलबत्त्याच्या मदतीने पाण्याने ओल केलेल्या जागी नारळ दोन भागांत फोडा. हळू-हळू मारल्यास नारळाचे तुकडे हवेत उडत नाहीत आणि हाताला दुखापत होण्याचा धोका कमी होतो. आता नारळाचा एक भाग गॅसवर ठेवून त्याच्या मध्यभागी हलकं तापवून घ्या. यांनतर तापवलेली नारळाची कवटी पाणी भरलेल्या वाटीत ठेवा आणि मग ती थंड झाली की अलगद नारळाला कवटीतून वेगळं करा. याने तुम्ही पाहाल की कोणतीही मेहनत न करता या ट्रिकने नारळाची अखंड भाग सहज हाताच्या मदतीने बाहेर येईल.
नारळ फोडण्याची आणखीन एक पद्धत
यासाठी नारळ ४-५ तास फ्रीजरमध्ये ठेवून द्या. थंडीमुळे नारळाचे कवच आकुंचन पावते आणि त्यात भेगा पडतात. त्यानंतर, हातोडा किंवा कोणत्याही जड वस्तूने हलकंच मारा, याने नारळ सहज फुटून बाहेर पडेल. ज्यांना जास्त जोर न लावता किंवा मेहनत न घेता नारळ फोडायचा आहे त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरेल.
नारळाचे फायदे काय?
नारळामधील निरोगी चरबी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नारळात असलेले फायबर पचन सुधारण्यास मदत करते. शिवाय याचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
नारळ फोडण्याच्या ट्रिकचे फायदे
नारळ फोडण्याची आणि खोबरे काढण्याची प्रक्रिया कमी वेळात होते. या पद्धतीने नारळ फोडण्यासाठी खूप जोर लावण्याची गरज नसते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.