
'या' आजारांनी त्रस्त असलेल्या महिलांनी चुकूनही करू नका जिऱ्याचे सेवन, शरीरासाठी ठरेल विषासमान
जिरं खाण्याचे फायदे?
कोणत्या व्यक्तींनी जिऱ्याचे सेवन करू नये?
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात कोणते बदल दिसून येतात?
भारतीय जेवणात वापरले जाणारे पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा गुणकारी असतात. त्यातील औषधी पदार्थ म्हणजे जिरं. डाळ, भाजी इत्यादी अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. साध्या डाळीची चव वाढवण्यासाठी त्यात हिंग, जिरं आणि लसूण टाकली जाते. जिरं खाल्ल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि पचनशक्ती कायमच मजबूत राहण्यास मदत होते. यामध्ये लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पण फायदेशीर वाटणारी प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली ठरत नाही. काहींना जिऱ्याच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर काहींना जिरं खाण्याची किंवा जिऱ्याचे पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. (फोटो सौजन्य – istock)
आरोग्यासंबंधित उद्भवलेल्या कोणत्याही स्थित जिऱ्याचे सेवन केल्यास शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे आजार बरा होण्याऐवजी वाढू शकतो. महिलांनी कमीत कमी प्रमाणात जिऱ्याचे सेवन करावे. अतिप्रमाणात जिरं खाल्ल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतील. शरीरात हळूहळू दिसून येणाऱ्या लक्षणांना ‘स्लो पॉयजन’ असे म्हणतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांनी आहारात जिऱ्याचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आरोग्यासंबंधित समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात.
कोणत्याही वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होते. अशावेळी जिऱ्याचे पाणी प्यायले जाते. पण काहीवेळा जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे स्नायू अधिक रिलॅक्स होतात आणि पुन्हा नव्याने ऍसिडिटी वाढून आरोग्य बिघडते. अन्ननलिकेमध्ये पुन्हा एकदा ऍसिडिटी तयार झाल्यामुळे छातीत जळजळ आणि उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
जिऱ्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी पूर्णपणे कमी होऊ शकते. अधिक प्रमाणात जिऱ्याचे सेवन केल्यास शरीरावर घातक परिणाम दिसू लागतात. कमी शुगर असलेल्या महिलांनी जिऱ्याचे सेवन केल्यास शरीरातील साखर पूर्णपणे कमी होऊन थकवा, अशक्तपणा आणि शरीर थरथरणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे मधुमेह आणि कमी शुगर असलेल्या महिलांनी जिऱ्याचे सेवन करू नये.
अतिप्रमाणात जिऱ्याचे सेवन केल्यामुळे उलट्या किंवा मळमळ होण्याची शक्यता असते. याशिवाय पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. तसेच लिव्हरसबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी जिऱ्याचे सेवन करू नये. जिऱ्याच्या सेवनामुळे खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा अस्थमासारखी लक्षणे दिसू लागतात.
Ans: जिरे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये असलेले थायमोल (thymol) आणि इतर घटक पाचक एंझाइम्सचे स्राव उत्तेजित करतात.
Ans: जिऱ्याचा वापर प्रामुख्याने पदार्थांना फोडणी देण्यासाठी, भाज्या, डाळ, रायता आणि सूपमध्ये चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो.
Ans: जिऱ्याचे अतिसेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे छातीत जळजळ (heartburn), अॅसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते.