Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगावर घोंघावतंय नव्या विषाणुच्या संक्रमणाचे संकट; Norovirus ने वाढवली इंग्लंडनंतर ‘या’ देशाची चिंता

आता कोरोनानंतर आणखी एक संसर्गजन्य विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू इंग्लंडमध्ये वेगाने पसरत असून कावासाकी नोरोव्हायरस संसर्ग (Kawasaki Norovirus Infection) सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता बनला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2025 | 04:41 PM
World is again in danger norovirus cases increased in England, america and Europe

World is again in danger norovirus cases increased in England, america and Europe

Follow Us
Close
Follow Us:

वर्ष 2019-2021 या काळात संपूर्ण जगावर दु:खाचे सावट होते. या काळात कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला होता. या व्हायरसमुळे अनेक लोकांचे प्राण गेले अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले होते. आता कोरोनानंतर आणखी एक संसर्गजन्य विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू इंग्लंडमध्ये वेगाने पसरत असून कावासाकी नोरोव्हायरस संसर्ग (Kawasaki Norovirus Infection) सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता बनला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला असून, रुग्णालयांनी गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे.

या नव्या व्हायरमुळे आता सर्वांच्या मनामध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा सर्व काही ठप्प तर होणार नाही ना? हा नवा व्हायरस किती घातक असू शकेल?

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मानवतेवर पुन्हा संकट? चीनमध्ये सापडला कोरोनासारखा नवा विषाणू, प्राण्यांपासून माणसात पसरण्याचा धोका

काय आहे नोरोव्हायरस?

नोरोव्हायरल हा एक अत्यंत संक्रमण विषाणू असून हा मूख्यत: हिवाळ्यात अधिक सक्रिय होतो. यासा “विंटर वोमिटिंग बग” देखील म्हणतात. या विषाणूचा संसर्ग झाल्यास अचानक आणि तीव्र उलटी, जुलाब यासारखी लक्षणे दिसून येतात. २०२५ च्या पहिल्या सात आठवड्यांत यूकेमध्ये 400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

नोरोव्हायरसची वाढती प्रकरणे आणि उपाययोजना

ब्रिटिश आरोग्य आणि सुरक्षा कार्यकारी (HSE) ने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या हिवाळी काळात आरोग्य केंद्रांवर मोठा ताण आहे आणि नोरोव्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती अधिकच बिघडू शकते. हा व्हायरस इंग्लंडपासून, अमेरिका आणि युरोपातील इतर देशांमध्येही या वेगाने वाढत आहे. त्यामुळे स्वच्छता नियम काटेकोरपणे पाळण्याचे आणि संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोरोव्हायरसचे लक्षण-

नोरोव्हायरस संसर्ग झाल्यास पुढील लक्षणे दिसू शकतात.

  • अचानक उलटी होणे
  • जुलाब
  • ताप येणे
  • मळमळणे आणि अस्वस्थ वाटणे
  • डोकेदुखी थकवा
  • अशक्तपणा
संक्रमण टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

नोरोव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत-

  • वारंवार हात धुणे आणि स्वच्छता राखणे
  • संसर्ग झालेल्या व्यक्तींनी घरात राहणे आणि इतरांपासून दूर राहणे
  • दूषित अन्न व पाणी टाळणे
  • सार्वजनिक ठिकाणी शक्यतो मास्कचा वापर करणे
नोरोव्हायरसचा नवीन प्रकार आणि त्याचा परिणाम

HSE ने दिलेल्या माहितीनुसार, 2024-25 च्या हिवाळ्यात नोरोव्हायररलचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. विशेष करुन GII.17 नावाच्या नवीन व्हेरिएंटमुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हा नवा प्रकार असल्याने लोकांमध्ये याबाबत प्रतिकारशक्ती कमी आहे आणि त्यामुळे संसर्गाची शक्यता अधिक आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आयर्लंडमध्येही या विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती.

संक्रमित देश

सध्या यूके, अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने, सार्वजनिक आरोग्य संस्थांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनमध्ये सापडला नवा Batvirus; माणसांची करू शकतो शिकार, दुसऱ्या महामारीचे सावट?

Web Title: World is again in danger norovirus cases increased in england america and europe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • coronavirus
  • Health News

संबंधित बातम्या

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
1

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
2

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
3

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.