Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कायमच्या होतील दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा नॅचरल फेस सीरम, त्वचेवर येईल ग्लो

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे महिनाभरात सुरकुत्या कमी होऊन त्वचा अधिक उजळदार आणि स्वच्छ होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 10:01 AM
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कायमच्या होतील दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा नॅचरल फेस सीरम, त्वचेवर येईल ग्लो

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कायमच्या होतील दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा नॅचरल फेस सीरम, त्वचेवर येईल ग्लो

Follow Us
Follow Us:

वाढत्या प्रदूषणचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येत आहे. त्वचेवर धूळ, माती आणि प्रदूषणामुळे मोठे मोठे फोड, पिंपल्स आणि सुरकुत्या येतात. हल्ली प्रत्येक महिला त्वचेच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे ग्लो कमी होऊन जातो. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त हानिकारक प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी कोणत्या नॅचरल फेस सीरमचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात अजिबात काळवंडणार नाही त्वचा! चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, त्वचा राहील गोरीपान

मध आणि लिंबाचं सीरम:

उन्हामुळे तुमची त्वचा खूप जास्त काळवंडली असेल तर मध आणि लिंबाच्या रसापासून बनवलेले फेस सीरम वापरावे. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. मधाच्या वापरामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकून राहतो आणि लिंबाचा रस चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करते. २० मिनिटं चेहऱ्यावर फेस सीरम लावून ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

हळद आणि खोबऱ्याचे तेल:

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी हळद अतिशय प्रभावी ठरेल. वाटीमध्ये हळद घेऊन त्यात खोबरेल तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात तर खोबरेल तेल त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लावल्यास चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळेल.

कोरफड जेल:

त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण त्याऐवजी घरगुती उपाय करावेत. चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी कोरफड जेल अतिशय प्रभावी ठरते. कोरफड जेल त्वचा आतून हायड्रेट करते आणि त्वचेमधील ओलावा वाढवते. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. २० मिनिटं झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा.यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Wrinkles on the face will be gone forever make a natural face serum at home in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
1

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
3

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
4

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.