उन्हाळ्यात अजिबात काळवंडणार नाही त्वचा! चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी, त्वचा राहील गोरीपान
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर, चमकदार आणि देखणी हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजरात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम लावल्या जातात तर कधी केमिकल युक्त स्किन केअर ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे कमी होऊन जातो. त्वचा खूप जास्त काळवंडल्यासारखी वाटते. चेहऱ्यावरील ग्लो कमी होण्यामागे बऱ्याचदा दैनंदिन जीवनातील सवयी कारणीभूत ठरतात. चुकीचा आहार, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. तसेच कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते.(फोटो सौजन्य – AI)
दैनंदिन जीवनात चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे चेहऱ्यावर लगेच परिणाम दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त निस्तेज झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण त्वचेची वरून काळजी घेण्यापेक्षा त्वचेला आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयीमुळे चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर त्वचेवर लगेच परिणाम दिसून येतो. त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर लगेच पिंपल्स येणे इत्यादी असंख्य समस्या उद्भवतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आतडे स्वच्छ होतात. पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
त्वचा कायमच स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे. धूळ, माती आणि प्रदूषणात कुठेही बाहेर गेल्यानंतर चेहऱ्यावर घाणीचा थर जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीच्या थरामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि काळी पडते. अशावेळी योग्य फेसवॉशचा वापर करून चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करणे आवश्यक आहे. दिवसभरात चेहरा पाण्याने किंवा फेशवॉशचा वापर करून सतत स्वच्छ करून नये.
सुंदर त्वचेसाठी शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. झोपेमुळे त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होते. कमी झोप झाल्यानंतर चेहरा खूप जास्त थकल्यासारखा वाटतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊन त्वचा निस्तेज आणि आजारी पडल्यासारखी वाटते. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे.
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे आहारात पालेभाज्या, फळे, सुकामेवा आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आहारात विटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहील आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल. त्वचा आतून मजबूत आणि तजेलदार ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत.






