२०२४ मध्ये निरोगी राहण्यासाठी 'या' पोषक घटकांचा सर्वाधिक सर्च
निरोगी आरोग्य जगण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आहारात पोषक घटकांचे सेवन करणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप, फळे भाज्यांचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. 2024 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षात अनेकांनी निरोगी आरोग्यासाठी अनेक प्रयत्न केले. खाण्यापिण्याच्या सवयी, पोषक आहार, व्यायाम, योगसने इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी 2024 मध्ये कोणते पोषक घटक सर्वाधिक सर्च करण्यात आले? आणि त्यांचा आरोग्याला नेमका काय फायदा आहे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पण जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाली तर आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. मॅग्नेशियम शरीराला आराम देण्याचे काम करते. तणाव कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मॅग्नेशियम फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात मॅग्नेशियम युक्त पदार्थांचे सेवन करावे.
शरीरातील निरोगी पेशींच्या कार्यसाठी झिंक आवश्यक आहे. त्यामुळे आहारात झिंक युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. झिंक हे पोषक तत्व असून यामुळे जखम आणि त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात झिंक युक्त पदार्थांचे सेवन करावे. काहींना झिंक या घटकांबद्दल फारशी माहिती नव्हती पण कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात झिंकसुद्धा खाल्ले जात होते.
शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन करावे. जीवनशैलीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अतिरिक्त कामाचा ताण, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, उशिरापर्यंत झोपणे, कमी सूर्यप्रकाशात जाणे इत्यादी गोष्टीमुळे शरीरातील विटामिन डी ची पातळी कमी होत जाते. त्यामुळे आहारात विटामिन डी युक्त सर्वच पदार्थांचे सेवन करावे.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या घटकांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा सुद्धा समावेश आहे. पूर्वी अनेकांना याबद्दल काहीच माहिती नव्हती मात्र कोरोनानंतर या घटकांचा सार्वधिक शोध घेण्यात आला. खराब आहार, तणाव, संसर्ग, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, प्रदूषण, दारू आणि असंतुलित आहार इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरातील पोषक घटकांची पातळी कमी होत जाते. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते.