बाबा रामदेवांनी दिला डायबिटीसवरील देशी उपाय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
भारताला सध्या मधुमेहाची राजधानी म्हटले जाते कारण येथे डायबिटीसच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे. प्रत्येक घरात किमान एक मधुमेहाचा रुग्ण आढळत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे हा आजार अनुवंशिक आहे. जर घरात एखाद्याला आधीच मधुमेह असेल तर येणाऱ्या पिढीला ही समस्या होण्याचा धोका जास्त असतो. ज्याला मधुमेह १ म्हणतात. दुसरीकडे, बिघडलेली जीवनशैली आणि लठ्ठपणा यासारख्या कारणांमुळे मधुमेह २ होऊ शकतो.
इतकंच नाही तर सध्याची खाण्यापिण्याची पद्धतही मधुमेह निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. एकदा डायबिटीस झाला की पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. परंतु तो नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यासाठी योग्य आहार आणि औषधांचीदेखील दररोज आवश्यकता असते. परंतु अलीकडेच योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मधुमेह नियंत्रित करण्याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
जांभूळ ठरते रामबाण उपाय
योगगुरू बाबा रामदेव यांनी व्हिडिओमध्ये जांभूळ आणि त्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधापेक्षा कमी नसल्याचे वर्णन केले आहे. तसेच, जांभळ्याच्या बिया या पचनासाठी चांगले असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. जांभळाच्या बिया या शरीराच्या स्वादुपिंडाच्या बीटा पेशी सक्रिय करण्यास मदत करतात, ज्यामुळे इन्सुलिन तयार होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करता येते. डायबिटीसच्या रुग्णांनी नियमित जांभळाचे सेवन करावे असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो आणि रामदेव बाबांनीही याबाबत सांगितले.
रोज फक्त 7 चमचे साखर! ना होणार डायबिटीस, ना सडणार Liver, FSSAI ने सांगितले तथ्य
बाबा रामदेव यांनी सांगितले की मधुमेहाचे रुग्ण नियमित जांभूळ खाऊ शकतात. याशिवाय, चांगल्या परिणामांसाठी, जांभळाच्या बियांची पावडर बनवून सेवन करता येते. त्यांनी सांगितले की सर्वप्रथम जांभळाच्या बिया चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर, त्यांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. यासोबतच, एक कारले घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा आणि उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. जांभळाच्या आणि कारल्याच्या बिया वाळवल्यानंतर, काळे जिरे, चिरईता आणि कुटकी (आयुर्वेदिक वनस्पती) चांगले वाळवा. आता या सर्व गोष्टी बारीक करा आणि याची जी पावडर तयार होईल त्याचे नियमित सेवन करावे.
जांभळाची पावडर खाण्याचे फायदे
योगगुरूंनी सांगितले की ही पावडर स्वादुपिंड सक्रिय करण्यास मदत करते. यासोबतच, ते पचनासाठी देखील फायदेशीर आहे. त्यांनी सांगितले की आंबा आणि जांभूळ दोन्ही एकाच हंगामात येतात. आंबा पचायला थोडा जड असतो, परंतु जांभूळ हा पचण्यासाठी अत्यंत चांगले आहे आणि डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान आहे. कारण ते पचनासाठी चांगले आहे.
आपल्या आहारात काही बदल करून, दररोज व्यायाम करून आणि अनेक गोष्टी लक्षात ठेवून मधुमेह नियंत्रित केला जातो. कारल्याचा आणि आवळ्याचा रसदेखील मधुमेहासाठी फायदेशीर मानला जातो. काही इतर घरगुती उपाय मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. पण कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कारण प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात.
दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.