Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

जास्वदींच्या फुलांपासून बनवलेले हेअर कंडिशनर केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 10:14 AM
विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. केस कोरडे पडणे, केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस तुटणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. केस मुलायम आणि मजबूत राहावे म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर कंडिशनरचा किंवा हेअर मास्कचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्ट केसांसाठी वापरणे अजिबात चांगले नाही. महागड्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे काही दिवस केस अतिशय चमकदार दिसतात. पण कालांतराने केस कोरडे होऊन जातात. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस कायमच घनदाट राहावे, म्हणून घरगुती पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. आज आम्ही तुम्हाला जास्वदींच्या फुलांचा वापर करून कंडिशनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

कंडिशनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • जास्वदींची फुले
  • पाणी
  • चहा पावडर
  • कॉफी पावडर

कंडिशनर बनवण्याची कृती:

जास्वंदीच्या फुलांचे हेअर कंडिशनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, जास्वदींची फुले पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर एक ते दोन लिटर पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली फुले घालून पाणी उकळवण्यासाठी ठेवा. टोपातील पाणी अर्धा होत नाही तोपर्यंत पाणी उकळवून घ्या. पाण्याला लाल रंग आल्यानंतर गॅस बंद करून त्यातील फुले काढून टाका. त्यानंतर पाण्यात कॉफी पावडर आणि चहा पावडर मिक्स करून पुन्हा एकदा १० मिनिटं पाण्याला उकळी काढा. तयार केलेले पाणी गाळून कोमट करून घ्या आणि केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे लावून काहीवेळ तसेच ठेवा. कंडिशनर केसांना लावताना त्यात शाम्पू मिक्स करा. यामुळे इतर कोणतेही हेअर मास्क किंवा कंडिशनर लावण्याची अजिबात आवश्यकता भासणार नाही.

Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा

कंडिशनर लावून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमधील कोरडेपणा कमी होईल आणि केस चमकदार दिसतील. जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. याशिवाय आठवड्यातून एकदा तुम्ही जास्वदींच्या पानांचा लेप सुद्धा केसांवर लावू शकता. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होईल आणि केस सुंदर दिसतील. जास्वदींची पाने आणि मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर भिजवलेली पाने मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि नंतर केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे केस चमकदार आणि स्वच्छ होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जास्वंदीच्या फुलांचा नैसर्गिक कंडिशनर केसांसाठी फायदेशीर आहे का?

    Ans: जास्वंदीमध्ये काही नैसर्गिक वनस्पतीजन्य घटक असतात. त्यापासून तयार केलेला लेप किंवा कंडिशनिंग मिश्रण केसांना मऊ आणि सहज विंचरता येण्यास मदत करू शकते.

  • Que: जास्वंदीच्या फुलांपासून घरच्या घरी कंडिशनर कसा बनवावा?

    Ans: जास्वंदीची स्वच्छ फुले बारीक वाटून त्यात आवश्यकतेनुसार अ‍ॅलोव्हेरा जेल किंवा दही मिसळून पेस्ट तयार करता येते. ही पेस्ट केसांच्या लांबीवर लावून काही वेळाने स्वच्छ धुवावी.

  • Que: जास्वंदीचा कंडिशनर आठवड्यातून किती वेळा वापरावा?

    Ans: आठवड्यातून १ ते २ वेळा वापरून पाहता येतो. केस आणि टाळूच्या प्रकारानुसार वापराची वारंवारता बदलू शकते.

Web Title: You wont feel the need for store bought conditioner at all make a natural hibiscus flower conditioner at home for soft silky hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
1

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
2

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
3

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात
4

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.