Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
संत्री, मोसंबी, आवळा, पेरू आणि लिंबू यांसारखी व्हिटॅमिन सीने भरपूर असलेली फळांचा दररोजच्या आहारात समावेश करा. व्हिटॅमिन सी शरीरातील कोलेजन निर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणून ही फळे खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
पालक किंवा मेथी सारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहाराचा आवर्जून समावेश करा. पालकाचा वापर सूप, स्मूदी, ज्यूस किंवा सलाडमध्ये करता येतो. अशा भाज्यांमधून शरीराला विविध पोषक घटक मिळतात. नियमित भाज्या खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
बदाम, काजू, अक्रोड सारखे ड्रायफ्रूट्स नक्की खा. बदामामध्ये व्हिटॅमिन ईसह विविध पोषक घटक असतात. तुम्ही बदाम पाण्यात भिजवूनही खाऊ शकता. याशिवाय भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया देखील खाऊ शकता.
तज्ज्ञांच्या मते, तरुण दिसण्यासाठी आहारातीस बहुतांश पदार्थ कमीत कमी शिजवलेले किंवा कच्च्या स्वरूपातील असावेत.त्यानुसार सुमारे ८० टक्के आहार कमी शिजवलेला किंवा न शिजवलेला खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, तुमच्या आरोग्यानुसारच या गोष्टींचे पालन करा.
याशिवाय ६०-४- चा नियम पाळावा. या पद्धतीनुसार पोट पूर्णपणे न भरता सुमारे ६० टक्केच भरावे, म्हणजेच कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करावे आणि उर्वरित ४० टक्के जागा रिकामी ठेवावी. यामुळे पचनसंस्था आणि यकृताला स्वत: ला रिकव्हर करतात. मात्र हा नियम सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही, त्यामुळे आहारात मोठे बदल करण्यापूर्वी वैद्यकीय किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

