Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? आलं आणि लिंबाचा ‘या’ पद्धतीने वापर करून बनवा इन्स्टंट हेअर डाय, केस होतील काळेभोर

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळेभोर करण्यासाठी आलं आणि लिंबाचा वापर करून बनवलेला हेअर डाय केसांवर लावावा. यामुळे केसांची नैसर्गिक चमक आणि गुणवत्ता कायम टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 10:14 AM
तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? आलं आणि लिंबाचा 'या' पद्धतीने वापर करून बनवा इन्स्टंट हेअर डाय, केस होतील काळेभोर

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? आलं आणि लिंबाचा 'या' पद्धतीने वापर करून बनवा इन्स्टंट हेअर डाय, केस होतील काळेभोर

Follow Us
Follow Us:

हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केसांच्या समस्या वाढू लागतात. तरुण वयात केस पांढरे होणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी उद्भवू लागल्यामुळे तरुणाई चिंतेमध्ये आहे. केस पांढरे झाल्यानंतर केसांची नैसर्गिक गुणवत्ता खराब होऊन जाते आणि केस अतिशय कोरडे पडतात. पांढरे केस काळे करण्यासाठी स्त्रिया वारंवार केमिकलयुक्त हेअर डायचा वापर करतात. यामुळे केस काही काळापुरते अतिशय सुंदर आणि काळेभोर दिसतात. पण आठवडाभरानंतर केस पुन्हा एकदा केस पांढरेच दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी आलं आणि लिंबाचा वापर करून नॅचरल हेअर डाय बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला हेअर डाय केसांवर लावल्यास केसांची चमक कायम टिकून राहील.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

नॅचरल हेअर डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

हेअर डाय बनवण्यासाठी आल्याचा रस, लिंबाचा रस, खोबरेल तेल, कॉफी पावडर, आवळा पावडर, मेहंदी, पाणी इत्यादी साहित्य लागणार आहे. हे सर्व साहित्य स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होते. नॅचरल हेअर डाय लावल्यामुळे केस केवळ काळे होत नाहीतर केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते आणि केस अतिशय मजबूत होतात.

हेअर डाय बनवण्याची कृती:

नॅचरल हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, आलं किसून त्यातील रस काढून घ्या. वाटीमध्ये आल्याचा रस घेऊन त्यात खोबरेल तेल, लिंबाचा रस, कॉफी पावडर, आवळा पावडर आणि मेहेंदी मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवा. तरुण वयात केस पांढरे झाल्यास कोणताही हेअर डाय लावण्याऐवजी घरी तयार केलेला नॅचरल हेअर डाय लावावा. यामुळे केस काळेभोर होतात. तयार केलेला हेअर डाय लावण्याआधी केस पाण्याने धुतलेले असावे. तेल असलेल्या केसांवर हेअर डाय लावू नये.

चमकदार दातांसाठी महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर थांबा! ‘हा’ घरगुती उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा कायमचा होईल नष्ट

हेअर डाय लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत हेअर डाय लावून १ तासभर तसाच ठेवा. त्यानंतर नॉर्मल पाण्याचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहील आणि केस घनदाट दिसतील. शाम्पू आणि कंडिशनरचा वापर दोन ते तीन दिवसानंतर करावा. आल्याच्या रसामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. खोबरेल तेल केसांच्या आतपर्यंत जाऊन मऊपणा कायम टिकवून ठेवते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कायमच नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुण वयात केस पांढरे होण्याची कारणे कोणती?

    Ans: अनुवंशिकता, पोषणातील कमतरता, काही आरोग्यविषयक समस्या, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात.

  • Que: आलं आणि लिंबाचा वापर करून केस काळे होतात का?

    Ans: आलं किंवा लिंबामुळे पांढरे झालेले केस कायमचे काळे होतात, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. घरगुती उपायांचा परिणाम व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

  • Que: आलं आणि लिंबाचा केसांवर वापर कसा करावा?

    Ans: अशा मिश्रणाचा वापर करण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. लिंबाचा रस थेट टाळूवर लावल्यास काही लोकांना जळजळ किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.

Web Title: Your hair turned grey at a young age make an instant hair dye using ginger and lemon in this way and your hair will turn jet black

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • amla benefits
  • hair care
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
1

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
2

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.