Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास 100 टक्के घरफाळा माफ; ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला महत्त्वाचा निर्णय

नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे गावचे बिरदेव डोणे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 02:51 PM
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास शंभर टक्के घरफाळा माफ

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास शंभर टक्के घरफाळा माफ

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास यंदाच्या वर्षासाठी घरफाळा माफ करण्याचा निर्णय करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनातून या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९१९ साली प्रयाग चिखली गावात पहिली शाळा सुरू केली. या शाळेला १०० वर्षांचा इतिहास आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचं संवर्धन व्हावं या उद्देशाने आणि शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावच्या ग्रामपंचायतीनं मासिक सभेत हा निर्णय घेतला आहे. सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या प्रयाग चिखली गावात ग्रामपंचायतीकडे १२३० नोंदणीकृत मिळकतधारक आहेत.

पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळं ग्रामपंचायतीला मिळणारा व्यावसायिक महसूल कमी प्रमाणात जमा होतो. मात्र, तरीही गावकऱ्यांनी एकी दाखवत जिल्हा परिषदेच्या शाळेचं पुनर्वसन, संवर्धन व्हावं आणि दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडं विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १०० टक्के घरफाळा माफ करण्याचा निर्णय घेतला. एका आर्थिक वर्षात सुमारे ४० ते ५० लाख रुपये महसूल प्रयाग चिखली गावचा जमा होतो. यामध्ये घरफाळा, पाणीपट्टीचा समावेश आहे.

बिरदेव डोणे यांनी घेतले जिल्हा परिषद शाळेत प्रवेश

नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे गावचे बिरदेव डोणे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळं दर्जेदार गुणवत्ता असलेल्या शाळा टिकाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीनं प्रयत्न केल्याचं उपसरपंच अर्जुन पाटील यांनी सांगितले.

पालकांना दिलासा मिळणार

प्रयाग चिखली ग्रामपंचायतने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळं गावातील पालकांना दिलासा मिळणार आहे. तर गावातील सोनतळी आणि प्रयाग चिखली विद्यामंदिर येथे प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या वर्गातील सुमारे ८० शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा फायदा होणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या शाळा संवर्धित होण्यासाठी ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

Web Title: 100 percent property tax waiver for admission in zilla parishad school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Property Tax

संबंधित बातम्या

Buy vs Rent: घर घेणं फायद्याचं की भाड्याने राहणं? काय आहे रिअल इस्टेटचा 1% Rule, जो वाचवू शकतो तुमचे लाखो रुपये!
1

Buy vs Rent: घर घेणं फायद्याचं की भाड्याने राहणं? काय आहे रिअल इस्टेटचा 1% Rule, जो वाचवू शकतो तुमचे लाखो रुपये!

Kolhapur News : पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं,कोल्हापुरात इंधन दरवाढीचा भडका!
2

Kolhapur News : पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं,कोल्हापुरात इंधन दरवाढीचा भडका!

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 
3

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 

Satej Patil On Gokul : ‘गोकुळ’वरून महायुतीवर निशाणा; लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्त्वाचा
4

Satej Patil On Gokul : ‘गोकुळ’वरून महायुतीवर निशाणा; लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्त्वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.