Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगाव जिल्हा रुग्णालयात १२ कोटींचा ‘लॅब’ घोटाळा?एकाच दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग' प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी खर्च करण्यात आलेल्या ११ कोटी ९९ लाख ५८ हजार ८०० रुपयांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 07, 2026 | 04:32 PM
Jalgaon, Jalgaon News, Health Scam, Corruption Alert, Breaking News, Maharashtra Politics,

Jalgaon, Jalgaon News, Health Scam, Corruption Alert, Breaking News, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग’ प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी खर्च
  • तांत्रिक मान्यता, प्रस्तावाचे सादरीकरण आणि निविदा प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक
  • काम पूर्ण होण्यास विलंब होऊनही संबंधित ठेकेदार कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही,
जळगाव (वा.) जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळेच्या नावाखाली तब्बल ११ कोटी ९९ लाख ५८ हजार ८०० रुपये खर्च दाखवून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी लगावला आहे.

या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

Dharashiv News : बनावट सह्या, शिक्के आणि लाखोंचा ‘खेळ’, बांधकाम कामगार नोंदणी घोटाळ्यात प्रशासन झोपेत?

तक्रारीनुसार, प्रयोगशाळा उभारणीची प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने राबविण्यात आली. तांत्रिक मान्यता, प्रस्ताव सादरीकरण आणि निविदा प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित ठेकेदार कंपनीला पूर्वनियोजित लाभ देण्यात आल्याचे नमूद आहे. या प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉ. कपिल आहेर, पुरवठादार कंपनीचे संचालक अजमीर खान शरीफ, तसेच तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यावर घेट आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि देयके मंजूर करणारे इतर अधिकारी-कर्मचारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

 

१२० दिवसानंतरही झाला विलंब, मात्र दंड नाही

निविदेनुसार १२० दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, काम पूर्णत्वाचा दाखला उशिराने देण्यात आला असून विलंबाबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच केवळ सुमारे १५०० चौ फुट जागेत १२ कोटींचे काम झाल्याचा दावा संशयास्पद असल्याचे तक्रारदाराने प्रत्यक्ष पाहणीत नमूद केले आहे.या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व शासनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी तक्रारदार दिनेश भोळे यांनी केली आहे.

Sindhudurga News : सिंधुदुर्गात सेवानिवृत्त शिक्षकांचे आंदोलन! जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले धरणे

 

कामापूर्वीच देण्यात आली देयके

महत्त्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच २ कोटी रुपये अदा करण्यात आले. त्यानंतरही काम अपूर्ण असल्याचे निरीक्षण अहवालात नमूद असताना आणखी २ कोटी ९९ लाख ९९ हजार १४० रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. दि. ०४ फेब्रुवारी २०२५ व दि. १७ मार्च २०२५ रोजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, प्रयोगशाळेच्या ठिकाणी यंत्रसामग्री ‘सीलबंद बॉक्स’ मध्ये असल्याचे आढळून आले व कोणतेही उपकरण कार्यान्वित नसल्याचा स्पष्ट अभिप्राय त्यांनी नोंदविला 00 होता. तरीदेखील देयके मंजूर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

 

 

Web Title: 12 crore lab scam in jalgaon civil hospital social activist alleges massive fraud in dna testing lab tenders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती
1

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण
3

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
4

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.