
Bhusawal Voter List Name Deletion Controversy, Jalgaon News, Bhusawal
भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावरकर यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. चुकीच्या हेतूने हे आक्षेप दाखल करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगून प्रशासनाला कठोर भूमिका घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Sanjay Raut Alleges Rs 150 Crore Offer: डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव १५० कोटी? संजय
प्रशासकीय अहवालानुसार, भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी टपालाने एकूण १४,५६७ आक्षेप प्राप्त झाले होते. हा मुद्दा सर्वप्रथम स्थानिक काँग्रेस बूथ लेव्हल एजंट (BLA) मुनावर खान यांनी उपस्थित केला होता. ज्यावेळी मी आक्षेप दाखल केलेल्या अर्जदारांशी संपर्क साधला, तेव्हा अनेकांनी फॉर्म-७ वर सही करण्यास नकार दिला. प्रकरण चिघळल्यानंतर आणि प्रशासनाने कारवाई केल्यानंतर, १८६ आक्षेप अर्जदारांपैकी किमान २१ जणांनी भीतीपोटी लेखी विनंती अर्ज सादर करून आपले २,५३२ आक्षेप मागे घेतले.
उर्वरित आक्षेपांची सत्यता पडताळण्यासाठी, प्रशासनाने सर्व अर्जदारांना वैयक्तिक नोटीस पाठवली आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वर्तमानपत्रांमध्ये एक सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करून ठोस पुरावे मागितले. यानंतर, संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्यक्ष जागेवर गेले आणि त्यांनी प्रत्येक अर्जाची कसून तपासणी केली. उपविभागीय अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, सर्व १४,५६७ आक्षेपांचे निराकरण करण्यात आले असून, केवळ ७४ नावे वगळण्यास पात्र असल्याचे आढळले.
kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, ”भाजपने मतांवर टाकलेल्या दरोड्याचा हा आणखी एक पुरावा.. अशा प्रकारे चोऱ्या चपाट्या करूनच सत्तेत आलेला भाजप संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे, या आमच्या विरोधी पक्षांच्या मताला यामुळं एकप्रकारे पुष्टीच मिळते. यांचे सगळे फंडे उघड झाल्याने डिलिमिटेशन माध्यमातून आता शेवटचा डाव खेळण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. डिलिमिटेशनला विरोध नाही पण ते केवळ भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांच्या सोयीने आणि संविधानाच्या विरोधात राबवलं जाणार असेल तर ते अधिक घातक आहे. मुळात मतचोरी करूनच सत्तेत आलेल्या भाजपावर विश्वास ठेवायचा कसा, हा प्रश्न आहे. त्यामुळं विरोधी पक्षातील सर्वांनी भाजपाचा हा डाव ओळखून तो वेळीच हाणून पाडायला पाहिजे..!