
पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ
पुणे : मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान अनधिकृत आणि विनातिकिट प्रवासाविरुद्ध मोठी मोहीम सुरु केली आहे. यामध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी वचनबद्ध असलेल्या मध्य रेल्वेने सात महिन्यांत तब्बल २३.७६ लाख प्रवाशांना विनातिकिट किंवा अवैध तिकिटासह प्रवास करताना पकडले. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या २२.०९ लाख होती, ज्यात ८ टक्के वाढ नोंदवली गेली. एकट्या पुणे विभागातून १५.१७ कोटी वसूल करण्यात आले आहेत.
या कारवाईत मध्य रेल्वेने सर्व विभाग मिळून १४१.२७ कोटींची दंडरक्कम वसूल केली असून, ही रक्कम २०२४-२५ च्या १२४.३६ कोटींच्या तुलनेत १४% अधिक आहे. फक्त ऑक्टोबर २०२५ महिन्यातच ३.७१ लाख प्रवाशांकडून २४.८१ कोटी दंड वसूल करण्यात आला, जो मागील ऑक्टोबरच्या तुलनेत तब्बल ९५% वाढ दर्शवतो. विभागनिहाय पाहता, भुसावळ विभाग आघाडीवर असून त्यांच्याकडून ५१.७४ कोटी, मुंबईतून ४०.५९ कोटी, नागपूरातून १५.६२ कोटी, पुण्यातून १५.५७ कोटी, सोलापूरातून ६.७२ कोटी, तर मुख्यालयाकडून ११.०३ कोटी दंड रक्कम जमा झाली.
हेदेखील वाचा : नांदेड-पुणे मार्गावर ‘वंदे भारत’ धावणार; 550 किमीचा प्रवास केवळ 7 तासांत करता येणार
स्टेशन तपासणी, सापळा तपासणी, फोर्ट्रेस ड्राईव्ह, तसेच विशेष मोहिमा राबवून ही कडक कारवाई करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये वाढलेल्या तक्रारींचा विचार करून विशेष वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथक कार्यरत करण्यात आले असून, हे पथक रोज सरासरी ३६८ प्रवाशांवर कारवाई करते. मध्य रेल्वेने प्रवाशांना विनातिकिट प्रवास टाळण्याचे आवाहन करत, वैध तिकीट खरेदी करून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.
हेदेखील वाचा : Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोअर बर्थबाबत नियम बदलले; आता सीटवर बसणे-झोपण्याच्या वेळेचा गोंधळ संपला
देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत रेल्वे
देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत रेल्वे धावत आहेत. त्यातच नांदेडहून पुण्याला धावणारी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 7 तासांवर येणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२६ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.