Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्‍वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविले अन् 150 लोकांना गंडा घातला

विश्‍वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खामगाव (ता. दौंड) येथील काही एजंट प्रत्येकी एक हजार रुपयांची बेकायदेशीररीत्या मागणी करत आहेत. याबाबत पुणे शहरातील दोन महिलांनी स्थानिक महिलांना हाताशी धरून खामगावमधील १५० महिलांकडून अवैधरीत्या दीडलाख रुपये उकळले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2024 | 03:23 PM
विश्‍वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविले अन् 150 लोकांना गंडा घातला
Follow Us
Close
Follow Us:

दौंड : विश्‍वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खामगाव (ता. दौंड) येथील काही एजंट प्रत्येकी एक हजार रुपयांची बेकायदेशीररीत्या मागणी करत आहेत. याबाबत पुणे शहरातील दोन महिलांनी स्थानिक महिलांना हाताशी धरून खामगावमधील १५० महिलांकडून अवैधरीत्या दीडलाख रुपये उकळले आहेत.

संबंधित एजंटाकडून व्यक्तींकडून विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे, टूलकिट मिळण्यासाठी पुन्हा पैसे किंवा बँकेकडून कर्ज पुरवठा मिळवून देण्यासाठी सुद्धा पुन्हा पैशांची बेकायदेशीर मागणी केली जात आहे. यासंदर्भात पुणे ग्रामीणमध्ये रॅकेट पसरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत १८ प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांतील कुशल कारागिरांसाठी प्रोत्साहन निधीसह व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसाठी अनुदान व पाच टक्के व्याजदराने बँकांकडून कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुशल कारागीरास सुतारकाम, लोहारकाम, हत्यारे बनविणे, कुलूप बनविणे, हातोडा टूलकिट बनविणे, सोनार कारागीर, कुंभार व्यवसाय, मूर्ति बनविणे, चांभार व्यवसाय, मिस्त्री कारागीर, होड्या बनविणे, फुलांचे हार बनविणे, न्हावी केशकर्तनालय, धोबी व्यवसाय, शिंपी कपडे शिवण, चटई झाडू बनविणे, पारंपारिक खेळणी बनविणारे, माशांचे जाळे बनवणारे, अशा १८ व्यवसायांपैकी जो व्यवसाय करायचा असेल, त्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये ऑनलाइन फॉर्म भरावयाचा असून तो लाभार्थ्यासाठी संपूर्णपणे निःशुल्क आहे.

त्यानंतर त्याचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यास पाच दिवस ते १५ दिवसांपर्यंतच्या प्रशिक्षणासाठी प्रति दिवस ५०० रुपयांप्रमाणे प्रोत्साहन निधी थेट मिळणार आहे. लाभार्थ्याने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या व्यवसायाच्या टुलकिटसाठी १५ हजार रुपयांचे खर्च व्हाउचर मिळणार आहे. त्यासाठी कोणतीही रोख रक्कम दिली जाणार नाही. हा व्यवसाय करण्यासाठी लाभार्थ्यास जर कर्ज पुरवठा आवश्यक असल्यास संबंधित बँकेकडून त्यांच्या नियमानुसार पाच टक्के व्याजदराने त्याच्या खात्यावरती मुदत कर्ज मिळणार आहे.

प्रत्येक महिलेकडून घेतले एक हजार रुपये

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महा ई-सेवा केंद्रामध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्यापासून ते बँकांकडून कर्ज पुरवठा मिळण्यापर्यंत कोणत्याही प्रकारे रोख रक्कम देण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सुविधा देण्यासाठी संबंधित प्रत्येक संस्थेस भारत सरकारकडून शुल्क दिले जाते. तरीसुद्धा संबंधित महिला एजंटांनी आता एक हजार रुपये व प्रकरण मंजूर झाल्यानंतर ३००० हजार रुपये या अटी ठेवत संबंधित लाभार्थ्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे.

[blockquote content=”या योजनेत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अथवा पुढील लाभ घेण्यासाठी कोणतेही पैसे, शुल्क आकारले जात नाही. याउलट योजनेची कार्यवाही करणाऱ्या संबंधित संस्थांना, घटकांना केंद्र सरकारकडूनच त्यांच्या कामाचे शुल्क दिले जाते. खोटी माहिती सांगून सामान्य जनतेची दिशाभूल करून बेकायदेशीररित्या पैसे उकळत असेल, तर अशा लोकांची तत्काळ माहिती आम्हाला कळवावी, आशा फसवणूक करणाऱ्या इसमांवरती कायदेशीर कारवाई करू.” pic=”” name=”- विकास जगताप, शासकीय संचालक, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना”]

Web Title: 150 people were lured to avail the benefits of the vishwakarma scheme nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • Daund
  • maharashtra

संबंधित बातम्या

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
1

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
2

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम
3

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

हस्तकला, लोककलेच्या मागणीत घट; पेठांमधील ग्रहकांची संख्या कमी होत असल्यामुळे कारागिरांपुढे उपजीविकेचा प्रश्न
4

हस्तकला, लोककलेच्या मागणीत घट; पेठांमधील ग्रहकांची संख्या कमी होत असल्यामुळे कारागिरांपुढे उपजीविकेचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.