Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

राज्यातील शाळांना २ मे ते १४ जूनदरम्यान उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर झाल्या असल्या, तरी शिक्षकांना या काळात विश्रांती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 06:20 PM
शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील शाळांना २ मे ते १४ जूनदरम्यान उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर झाल्या असल्या, तरी शिक्षकांना या काळात विश्रांती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना १६ मे ते १४ जून या कालावधीत जनगणनेचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन केलेल्या अनेक शिक्षकांचे नियोजन विस्कळीत झाले असून, शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी विश्रांतीचा असला, तरी शिक्षकांना या काळात जनगणनेची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. प्रशासनाने शिक्षकांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याने त्यांना या कालावधीत आपल्या कार्यक्षेत्रातच राहावे लागणार आहे.

जनगणना मोहिमेसाठी शिक्षकांना १६ मेपासून घराघरांत जाऊन माहिती संकलन करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यासाठी त्यांना संबंधित कुटुंबांची माहिती नोंदवून ती प्रशासनाकडे सादर करावी लागणार आहे. ही प्रक्रिया १४ जूनपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, अनेक शिक्षकांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत प्रवास, वैयक्तिक कामे किंवा विश्रांतीचे नियोजन केले होते. मात्र अचानक आलेल्या या आदेशामुळे त्यांचे नियोजन रद्द करावे लागल्याचे शिक्षकांनी सांगितले. मुख्यालय न सोडण्याच्या अटीमुळे गावाला जाणे किंवा इतर वैयक्तिक कामे करणेही कठीण झाले असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून, शिक्षक ते पारदर्शकपणे पार पाडतील. मात्र टीईटीची तयारी व इतर शासकीय कामांमुळे अडचणी येत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर नियुक्त केल्यास शिक्षकांना मदत होईल, त्यांना रोजगार मिळेल आणि दहावी-बारावीशी संबंधित नियोजित शैक्षणिक कामकाजही वेळेत पूर्ण होऊ शकेल. -प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना.

 

जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असले तरी वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर ताण वाढला आहे. प्रशासकीय कामांमुळे अध्यापनासाठी वेळ कमी पडत असून, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही. सततच्या ऑनलाइन कामांमुळे मानसिक-शारीरिक ताण वाढत आहे. टीईटी परीक्षेची सक्ती असल्याने नैराश्यही वाढत आहे. शिक्षक शाळेबाहेर गुंतल्याने विशेषतः ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत आहे. -कांबळे संदीप (अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र)

Web Title: Even though summer vacations have been declared for schools teachers will have to work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Teachers

संबंधित बातम्या

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
1

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
2

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
3

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.