Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद

पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला असून, गर्दी विचारात घेऊन वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी विसर्जन मार्ग, मध्यभाग व प्रमुख रस्त्यांसह इतर १७ रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2024 | 05:09 PM
पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला असून, गर्दी विचारात घेऊन वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी विसर्जन मार्ग, मध्यभाग व प्रमुख रस्त्यांसह इतर १७ रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हर्शन पॉईंट काढले असून वाहन धारकांना पर्यायी मार्गही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मिरवणूक संपेपपर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे.

वैभवशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूक मंगळवारी (दि.१७) सकाळी सुरूवात होते. सहसा सोमवारी रात्रीपासूनच काही मंडळ मिरवणूकीची तयारी करतात. रस्त्यांवर देखील त्याची लगभग सुरू झालेली असते. विसर्जन मिरवणूकीवेळी शहरातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रोड, बगाडे रोड, गुरू नानक रोड हे रस्ते काही टप्प्यांत वाहतूक विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत.

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्त्यावरील दारूवाला पुल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दूर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोडवरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकातून डायव्हर्शन पाँईट काढण्यात आले आहेत. तर, लक्ष्मी रोड, केळकर, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ठिकठिकाणी नो पार्किंग केले आहे. खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणार्‍या उपरस्त्यांच्या १०० मीटर परिसरात पार्किंगकरीता बंदी घालण्यात आली आहे.

संपुर्ण शहरात अवजड वाहनांना बंदी

गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१७) रात्री १२ ते बुधवारी (दि.१८) रात्री बारापर्यंत एकूण ४८ तास संपुर्ण शहरामध्ये सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

वाहनधारकांसाठी पर्यायी रिंगरोड

विसर्जन मिरवणूकवेळी बंद केलेल्या रस्त्याकरीता पर्यायी मार्ग रिंग रोड तयार केला आहे. कर्वे रोड-नळस्टॉप चौक- लॉ कॉलेज रोड- सेनापती बापट रोड जंक्शन -गणेशखिंड रोड सिमला ऑफिस चौक -संचेती हॉस्पीटल चौक -इंजि. कॉलेज चौक -आंबेडकर रोडवरील शाहिर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक -नरपतगिरी चौक -नेहरु रोडवरुन संतकबीर पोलीस चौकी -सेव्हन लव्हज चौक -वखार महामंडळ चौक-शिवनेरी रोडवरुन गुलटेकडी मार्केटयार्ड -मार्केटयार्ड जंक्शन सातारा रोड ते व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) -सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक सिंहगड रोड जंक्शन -लाल बहादुर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी,- अनंत कान्हेरे पथावरुन म्हात्रे पुल ते नळस्टॉप या मार्गाचा वापर करावा.

Web Title: 17 major roads closed for traffic on the occasion of ganesh visarjan procession nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
2

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
3

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
4

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.