
Tulsi Vivah 2026: आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे...! तुळशी विवाहाच्या नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा
Tulsi Vivah 2026: हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप जास्त महत्व आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत प्रामुख्याने तुळशी विवाह साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा सुंदर संगम आहे. प्रत्येक घरात तुळशी विवाह असतो. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंचे तुळशीमातेशी विवाह झाला होता. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. तुळशी विवाहाच्या दिवशी घरातील तुळशीला सजवून छान तयार केले जाते. मंगलाष्टके, अक्षता, फुलांची आरास आणि पारंपरिक विवाह सोहळ्यानुसार विधी करून तुळशी विवाह साजरा केला जातो. हिंदू परंपरेत तुळशी विवाहानंतर विवाहसोहळ्यांच्या शुभमुहूर्तांना सुरुवात होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे तुळशी विवाहाच्या नातेवाईक आणि प्रियजनांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा.(फोटो सौजन्य – pinterest)
आजच्या या मंगल दिवशी तुळशीमातेचं आणि श्रीविष्णूचं पवित्र मिलन साजरं करताना
आपल्या घरातही सद्भाग्य, प्रेम, आणि समृद्धीचा वर्षाव होवो हीच प्रार्थना.तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे,
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे,
ते घर स्वर्गासमान आहे.
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुळशी-विष्णू विवाह हा धर्म, संस्कृती आणि नात्यांतील पवित्रतेचं प्रतीक आहे.
या मंगल दिनी तुमचं आयुष्यही अशाच श्रद्धा आणि प्रेमाने फुलत राहो.
शुभ तुळशी विवाह
तुळशी विवाहाच्या शुभ दिनी,
चला आनंद वाटूया आणि या खास क्षणासाठी तुळशीला सजवूया.
तुळशी विवाहानिमित्त तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, हीच सदिच्छा!
या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात नव्या आशा,
नवं सौख्य आणि नव्या उर्जेचा संचार होवो!
शुभ तुळशी विवाह!
तुळशी आणि विष्णू यांच्या पवित्र मिलनाच्या साक्षीने
तुमच्या घरातही सुख, समृद्धी आणि शांतीचं वातावरण नांदो.
तुळशी विवाहाच्या मंगल शुभेच्छा!
आजच्या या मंगल तुळशी विवाहाच्या निमित्ताने
तुमच्या जीवनात नात्यांचं सौंदर्य, प्रेमाचा सुगंध आणि भक्तीचा प्रकाश कायम राहो.
हार्दिक शुभेच्छा
साजरा करूया तुळशीचा विवाह सोहळा,
तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येवो.
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुळशीमातेच्या पूजनाने पापांचा नाश होतो, पुण्य वाढतं,
आणि घरात शांतीचा वास होतो.
अशा या पवित्र दिवशी तुमच्या आयुष्यात सर्व मंगल घडो.
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशी विवाहानिमित्त, तुमच्या संसाराला अखंड सौभाग्याचे वरदान मिळो.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
भिंतींवर सजतील दिव्यांच्या माळा,
संपूर्ण घरात होईल सुंदर सजावट.
तुळशी विवाहाच्या निमित्ताने देतो शुभेच्छा,
होवो तुमची अखंड भरभराट.
आज सजली तुळस, नेसून हिरवा शालू,
अंगणात उभारला आज, तुळशी विवाहाचा पर्व.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशी विवाह हा श्रद्धेचा, भक्तीचा आणि सौभाग्याचा उत्सव आहे.
या शुभ प्रसंगी तुमच्या जीवनातही भक्तीचा प्रकाश आणि आनंदाचा सागर वाहू दे!
शुभ तुळशी विवाह
देवदिवाळीच्या प्रारंभी तुळशी विवाह साजरा करताना
देवविवाहाचं मंगल गाणं गात तुमचं घरही आनंदाने उजळून जावो!
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीमातेच्या आशीर्वादाने तुमचं वैवाहिक जीवन सुखी होवो,
प्रेम अधिक दृढ होवो आणि सर्व अडथळे दूर व्हावेत.
शुभ तुळशी विवाह!
आजचा दिवस आहे भक्तीचा, सौंदर्याचा आणि श्रद्धेचा.
तुळशीमातेचं पूजन करताना घरात आणि मनातही शांतीचा प्रकाश फुलू दे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीमाता आणि विष्णू भगवान यांच्या दिव्य मिलनाने
तुमच्या नात्यांमध्येही सौंदर्य, स्थिरता आणि प्रेम नांदो.
शुभ तुळशी विवाह!
तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीशिवाय सर्व काही उजाड
तुळशीशिवाय सर्व काही अपूर्ण
घर, अंगण आणि श्रीकृष्णाचे ५६ भोग
तुळशीच्या एका पानानं होतात पूर्ण
तुळशी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
दारी सजवून ऊसाचा मंडप
उडवून देऊ तुळशी विवाहाचा बार
आमच्या घरचा सोहळा चुकवू नका
एकत्र मिळून घेऊ आनंद अपरंपार
तुळशी विवाहाच्या अनंत अभिनंदन आणि शुभेच्छा
तुळशीच्या पानांत दडलंय आरोग्याचं वरदान,
श्रीविष्णूंच्या सोबतीने सजलंय आज तुळशी वृंदावन छान…
या मंगलमय विवाहाने तुमच्या घरात येवो सुख आणि शांती,
आयुष्यात कायम राहो अशीच आनंदाची क्रांती!
तुळशी विवाहाच्या मंगलमय शुभेच्छा!
सनई-चौघड्यांचे सूर घुमले आज अंगणात,
तुळशीच्या लग्नाचा उत्साह मावेना कोणाच्याच मनात…
श्रीकृष्ण आणि तुळशी मातेचा आशीर्वाद तुम्हाला लाभो,
अन् तुमच्या घराची भरभराट अशीच अखंड होत राहो!
कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या या पवित्र पर्वावर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभमंगल सावधान! माता तुळशी आणि भगवान श्रीविष्णू यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुळशी विवाहाच्या गोड शुभेच्छा!
रांगोळीच्या रंगांनी सजले आहे घराचे अंगण,
आज आहे श्रीहरी आणि तुळशी मातेचे शुभ मिलन…
या पवित्र सोहळ्याने दूर होवोत तुमची सारी दुःखे,
आयुष्यात लाभोत तुम्हाला जगातील सर्वच सुखे!
Tulsi Vivah 2026: भगवान विष्णूंनी तुळशीला का दिलं वरदान? जाणून घ्या तुळशी विवाहाची कथा
उसाचा मांडव अन् फुलांची आरास,
अंगणात दरवळतोय भक्तीचा सुवास…
श्रीहरी आणि तुळशीचे आज शुभ मिलन,
आनंदाने भरून गेले आहे सर्वांचेच मन!
तुलसी मातेचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो