Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भंडाऱ्यात 18430 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पण 3698 आधार प्रमाणीकरण अपूर्ण

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी १ हजार २८ जणांना ४ कोटी २१ लाख रुपयांचे नवीन खरीप पीककर्जही वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जमाफीसोबतच नव्या हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 01:16 PM
भंडाऱ्यात 18430 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पण 3698 आधार प्रमाणीकरण अपूर्ण

भंडाऱ्यात 18430 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पण 3698 आधार प्रमाणीकरण अपूर्ण

Follow Us
Follow Us:

भंडारा : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ४३० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील २६ हजार ७४२ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यापैकी २३ हजार ४४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यासह प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे यांनी तक्रार निवारण, आधार प्रमाणीकरण आणि लाभवाटपाची माहिती दिली. जिल्हास्तरीय तक्रार प्रक्रिया निवारण समितीने बहुतांश तक्रारी निकाली काढल्याचेही त्यांनी सांगितले.

अकोल्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज; दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरु

जिल्हास्तरीय समितीकडे आतापर्यंत २०४ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, २३ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. दुसरीकडे, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्राप्त झालेल्या सर्व ३६ ऑफलाइन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तक्रारींचा निपटारा करण्यासोबतच पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील २६ हजार ७४२ पात्र शेतकऱ्यांपैकी ३ हजार ६९८ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

1845 शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी १ हजार २८ जणांना ४ कोटी २१ लाख रुपयांचे नवीन खरीप पीककर्जही वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जमाफीसोबतच नव्या हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ हजार ६९८ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. कर्जमाफीसाठी प्रमाणीकरण अनिवार्य असल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे उर्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे, फार्मर आयडीअभावी अडलेली प्रकरणे मार्गी लावणे आणि प्रलंबित ऑनलाइन तक्रारींचा निपटारा करणे, या बाबींवर पुढील टप्यात भर राहणार आहे.

IIT vs NIT Fees : IIT आणि NIT मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या कुठे मिळतो कोट्यवधींचा पगार अन् कसा होतो प्रवेश

Web Title: 18430 farmers in bhandara benefit from loan waiver nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • bhandara news
  • Farmer Issue

संबंधित बातम्या

Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप
1

Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप

पत्नी पाण्यात पडली अन् पतीने क्षणाचाही विलंब न करता घेतली उडी; वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही अंत
2

पत्नी पाण्यात पडली अन् पतीने क्षणाचाही विलंब न करता घेतली उडी; वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.