Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: पास झाल्याच्या आनंदात पोहण्यास गेलेल्या 2 मुलांचा विहिरीची भिंत कोसळून मृत्यू

सुदैवाने यात ३ मुले मात्र बचावली. या दोघांसह अन्य तीन मुले बोरामणी गावच्या शिवारात असलेल्या दत्तात्रय शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी बारा वाजता मुले पोहायला गेली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 03, 2025 | 03:59 PM
Solapur News: पास झाल्याच्या आनंदात पोहण्यास गेलेल्या 2 मुलांचा विहिरीची भिंत कोसळून मृत्यू
Follow Us
Follow Us:
सोलापूर: महाराष्ट्रदिनी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांच्या अंगावर विहिरीची भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्हयातील बोरामणी येथे घडली. नैतिक सोमनाथ माने (१५) व भीमरत्न ऊर्फ गौरव हरिश्चंद्र राजगुरू (१४) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत. १ मे रोजीच नैतिक माने हा नववी तर भीमरत्न राजगुरू हा सातवी उत्तीर्ण झाला होता.
सुदैवाने यात ३ मुले मात्र बचावली. या दोघांसह अन्य तीन मुले बोरामणी गावच्या शिवारात असलेल्या दत्तात्रय शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी बारा वाजता मुले पोहायला गेली होती. ही दगडी बांधकाम केलेली विहिर ३५ ते ४० फूट खोल आहे. सर्वमुले पोहण्याचा आनंद लुटत असतानाच अचानक विहिरीच्या एका बाजूचा दगडी भिंत कोसळली.
यावेळी त्या बाजूला पोहत असलेले नैतिक आणि भीमरत्न हे दगड मातीच्या खाली अडकले. मात्र अन्य तिघे दुसऱ्या बाजूला पोहत असल्याने बचावले. विहिरीचा कठडा कोसळल्यानंतर या मुलांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतातील लोकंही धावत आले. बोरामणीचे ग्रामस्थ व पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तीन मुलांना पाईप व दोरीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार
शुक्रवारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर दुपारी तीन वाजता बोरामणी येथे या दोन्ही मुलांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही जिवलग मित्रांना एकाच सरणावर अग्नी देण्यात आला. हे पाहून दोन्ही कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. नैतिक माने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

सायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, बुधवारी परीक्षा संपल्यावर आणि एक मे पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला.

मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; दमछाक झाली अन्…
सर्व मित्र पाण्याबाहेर असताना पोहोण्यासाठी तो पाण्यात उतरला. काही अंतर गेल्यावर त्याची दमछाक झाली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार हे पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीमसह दाखल झाले. दीड तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मृतदेह सापडला.

Web Title: 2 children died well wall collapsed while were swimming after passing their exams solapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Drowned
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
1

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
2

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
3

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
4

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.