देव तारी त्याला...! 'माझ्या पोरांना सांभाळ' म्हणत तरुणाने घेतली नदीत उडी; पण...(File Photo : Drowned)
रसायनी : रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, बुधवारी परीक्षा संपल्यावर आणि एक मे पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला.
सर्व मित्र पाण्याबाहेर असताना पोहोण्यासाठी तो पाण्यात उतरला. काही अंतर गेल्यावर त्याची दमछाक झाली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार हे पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीमसह दाखल झाले. दीड तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मृतदेह सापडला.
दरम्यान, अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत.
नदीत बुडून तिघांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथे दुर्दैवी घटना घडली. वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. वाशिष्ठी नदीचा डोह १२ ते १४ फूट खोल आहे. या ठिकाणी नदीचे पाणी वाहत असते. लक्ष्मण कदम (वय ८), लता कदम आणि रेणुका शेंडे अशी मृतांची नावे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, अत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. आठ वर्षीय लक्ष्मण कदम नदीच्या डोहात आंघोळ करत होता. त्यावेळी तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम आणि आत्या रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.