Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाच्या खर्चात 2192 कोटींची लक्षणीय वाढ, अद्यापही 100 टक्के काम पूर्ण नाही

आतापर्यंत 2 डेडलाईन चुकविणाऱ्या कंत्राटदारांवर कोणताही दंड आकारला गेला नसून अजूनही 100 टक्के काम पूर्ण न झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2023 | 05:38 PM
शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाच्या खर्चात 2192 कोटींची लक्षणीय वाढ, अद्यापही 100 टक्के काम पूर्ण नाही
Follow Us
Follow Us:

नवी मुंबई : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने कार्यरत शिवडी न्हावा शेवा म्हणजेच पारबंदर प्रकल्पाच्या मूळ खर्चात 2192 कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत 2 डेडलाईन चुकविणाऱ्या कंत्राटदारांवर कोणताही दंड आकारला गेला नसून अजूनही 100 टक्के काम पूर्ण न झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिवडी – न्हावा शेवा प्रकल्पाची माहिती एमएमआरडीए प्रशासनाकडे विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रात प्रकल्पाची पॅकेज 1, 2 आणि 3 ची सर्वसाधारण भौतिक प्रगती – 98.92 टक्के तर पॅकेज 4 ची भौतिक प्रगती 82 टक्के आहे. सरासरी भौतिक प्रगती 98.41 टक्के आहे. डिसेंबर 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. अनिल गलगली यांच्या मते वेळेत काम पूर्ण न झाल्याने खर्चात वाढ झाली आहे. यात कंत्राटदारांची चूक आहे. वाढीव रक्कम देण्याऐवजी उलट दंड आकारणे अधिक योग्य होईल.

खर्चात 2192 कोटींची लक्षणीय वाढ
सदर प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे. पॅकेज 1 अंतर्गत मे. लार्सन अँड टुब्रो लि. आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं. लि. कंसोशिअम यांची कंत्राटीय किंमत 7637.30 कोटी होती. यात आता 999.67 कोटींची वाढ झाली आहे. पॅकेज-2 अंतर्गत मे. देवू इंजिनिअरींग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लि. व टाटा प्रोजेक्ट्स लि. जेव्ही यांची कंत्राटीय किंमत 5612.61 कोटी होती यात आता 936.45 कोटींची वाढ झाली आहे. पॅकेज 3 अंतर्गत मे. लार्सन अँड टुब्रो लि यांची कंत्राटीय किंमत 1013.79 कोटी होती. आता यात 232.37 कोटींची वाढ झाली आहे. पॅकेज 4 अंतर्गत मे. स्ट्रॉबॅग इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सेफ्टी सोल्यूशन्स जीएमबीएच जेव्ही यांची कंत्राटीय किंमत 449 कोटी होती. आता यामध्ये 23.24 कोटींची वाढ झाली आहे. मूळ खर्च 14712.70 कोटी इतका होता आता यात 2192.73 कोटींची वाढ झाली आहे. आता 16904.43 कोटी इतका खर्च झाला आहे.

कंत्राटदारांनी 2 मुदतवाढ चुकवली
कंत्राटदारांनी 2 मुदतवाढ चुकवली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी काम पूर्ण करणे अपेक्षित होते. एमएमआरडीए प्रशासनाने 22 सप्टेंबर 2023 ही प्रथम मुदत वाढ दिली. यानंतर 15 डिसेंबर 2023 ही दुसरी मुदतवाढ आहे. पण अद्यापही काम पूर्ण झाले नाही. शासन शिवडी न्हावा शेवा मार्ग उभारत आहे. १२ जानेवारी रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्धाटन होणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यासाठी आग्रही आहे. देशातील सर्वाधिक लांब सागरी पुल अशी गणना या पुलाची झालेली आहे. या पुलामुळे मुंबईतून १५ मिनिटांत थेट नवी मुंबईत पोहोचता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईतील सायन पनवेल महामार्गाच्या वाहतूककोंडीला वगळून नागरीकांना पोहोचणे सुलभ होणार आहे.

Web Title: 2192 crore significant increase in cost of shivdi nhava sheva project still not 100 percent complete navi mumbai maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 05:38 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mumbai
  • Navi Mumbai
  • Shivdi
  • thane

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
2

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.