Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Devendra Fadnavis: माथाडी कायदा कायम राहणार असून त्याला कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. माथाडी कामगारांसाठी वडाळा येथे तीन हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2026 | 03:28 PM
माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Follow Us
Follow Us:
  • माथाडी कायदा कायम राहणार
  • वडाळ्यात कामगारांना मिळणार 3 हजार घरे
  • मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
ठाणे : माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी, असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय अण्णासाहेबांच्या त्यागाला जाते.

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे. काही घटकांकडून हा कायदा संपवला जाईल असा संभ्रम निर्माण केला जात असला तरी शासन हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही. मात्र, या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील. यासोबतच 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांसंदर्भातील नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कामगार विभागाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, सुमारे 3 हजार माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय शासन उपलब्ध करून देईल. या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल.

शेवटी, माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. “आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत,” अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कामगारांना आश्वस्त केले.

वन मंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीवर भर दिला. अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून मिळवून दिलेल्या कायदेशीर संरक्षणामुळेच माथाडी कामगारांना समाजात मान-सन्मान मिळाला आहे, याचे स्मरण करून देत नाईक म्हणाले की, आता कामगारांच्या पुढच्या पिढीने केवळ श्रमापुरते मर्यादित न राहता शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, सीए आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. कामगारांच्या आरोग्यासाठी माथाडी रुग्णालयाच्या सुविधांचे आधुनिकीकरण आणि वडाळा प्रकल्पातील घरांचे काम विनाविलंब पूर्ण व्हावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. शेतकरी माल पिकवतो, परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या विपणन साखळीत माथाडींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वाशी मार्केटच्या इमारती आता जीर्ण झाल्या असून, बदलत्या जागतिक व्यापाराची गरज ओळखून या संपूर्ण बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण कितीही आले तरी माथाडी कामगारांचे काम आणि महत्त्व अबाधित राहील, असे स्पष्ट करत 50 किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी चळवळीची एकता आणि कायदेशीर संरक्षणाचा मुद्दा मांडताना सांगितले की, माथाडी कायद्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू न देणे ही सर्व कामगार प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी आहे. असंघटित कामगारांना हक्काचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि बोनस मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक कायद्याची मूळ चौकट कायम ठेवूनच त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत. माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर प्रतिबंध घालून खऱ्या कष्टकरी कामगारांचे हित जपले पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मानकांनुसार हमाली करणाऱ्या कामगारांसाठी 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे नसावे, हा नियम असूनही बाजारात अधिक वजनाची पोती आणली जात असल्याचे नमूद करत त्यांनी या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून कामगारांना हक्काची घरे मिळवून देणे, वाशी एपीएमसी मार्केटचा कालबद्ध पुनर्विकास करताना नोंदणीकृत माथाडी कामगारांना निवासी व व्यावसायिक गाळे मिळवून देणे आणि कामगारांच्या मुलांना विविध कल्याणकारी योजनांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रुणवाल ग्रुप चे उपाध्यक्ष महेश खेतपाल यांनी वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पासंबंधीचे सादरीकरण केले व या माथाडी कामगार बांधवांच्या हितासाठी रुणवाल ग्रुप सदैव कटिबद्ध राहील,अशी ग्वाही दिली. आमदार निरंजन डावखरे यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळग्रस्त भागाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा करण्यासाठी धनादेश सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक भरत चव्हाण व ओंकार चव्हाण हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत माथाडी कामगारांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Web Title: Mathadi act will continue 3000 houses for workers in wadala cm devendra fadnavis announces vashi market yard redevelopment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Navi Mumbai
  • Vashi

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
1

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?
2

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट,  नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
4

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.