Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑगस्टसाठी साखरेचा २३.५० लाख टन कोटा, शिल्लक साखर विक्रीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; ऊस उत्पादनात घट होणार ?

केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २३ लाख ५० हजार टन इतका साखरेचा कोटा जाहीर केलेला आहे. तसेच, जुलै महिन्याच्या २४ लाख टन कोट्यातील शिल्लक साखर विक्रीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2023 | 07:15 AM
ऑगस्टसाठी साखरेचा २३.५० लाख टन कोटा, शिल्लक साखर विक्रीस  १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; ऊस उत्पादनात घट होणार ?
Follow Us
Follow Us:

पुणे : केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २३ लाख ५० हजार टन इतका साखरेचा कोटा जाहीर केलेला आहे. तसेच, जुलै महिन्याच्या २४ लाख टन कोट्यातील शिल्लक साखर विक्रीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. असे असले तरी उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे ऊस उत्पादनात काहीशी घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, आगामी सणासुदीच्या दिवसांमुळे साखरेला मागणी चांगली राहून दरपातळी स्थिरावण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यात श्रावण महिना, राखी पौर्णिमा असून, श्रावणापासून सणासुदीची मागणी सुरू होत असते. त्यामुळे साखरेचा मुबलक कोटा असला तरी दरावर कोणताही परिणाम न होता ते तेजीत स्थिरावण्याचा अंदाज व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे. सध्या साखर कारखान्यांकडील निविदा क्विंटलला ३४८० ते ३५२० रुपयांपर्यंत जात आहेत. तर, बाजारपेठेत एस ३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर ३८०० रुपये आहे. कोटा मुबलक असला तरी साखरेला राहणारी मागणी लक्षात घेता दरावर तूर्तास कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, किरकोळ बाजारात साखरेची विक्री प्रतिकिलोस ३८ ते ४० रुपये दराने होत आहे. सुमारे १२५ साखर कारखान्यांकडून उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यामुळे कारखान्यांकडूनही गरजेइतकीच साखर विक्री करण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे साखर विक्री कमी होणे आणि सणासुदीमुळे मागणी चांगली राहण्याच्या अपेक्षेमुळे दर उंचच राहण्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तविला.

Web Title: 23 50 lakh tonne quota of sugar for august deadline for sale of remaining sugar extended till august 15 sugarcane production will decrease nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 07:15 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Dilip Walse
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.