Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ‘या’ प्रकरणाने उडवली संस्थाचालक, माजी शिक्षणाधिकाऱ्यांची झोप… नेमकं प्रकरण काय?

Jalgaon News: शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर वाढत असून, जळगाव जिल्ह्यात संशयास्पद 259 शालार्थ आयडी समोर आले आहेत. या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्यानंतर शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांना एसआयटीने अटक केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 31, 2026 | 11:21 AM
Jalgaon News: 'या' प्रकरणाने उडवली संस्थाचालक ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: 'या' प्रकरणाने उडवली संस्थाचालक ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगाव जिल्ह्यात 259 संशयास्पद शालार्थ आयडी आढळले 
  • शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांना एसआयटीने अटक
  • संस्थेतील 177 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीचे प्रस्ताव बनावट असल्याचा संशय 
  • नाशिक एसआयटीने संस्थेत छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
Jalgaon News: शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर वाढत असून, जळगाव जिल्ह्यातही या प्रकरणातील संशयास्पद २५९ शालार्थ आयडी समोर आले आहेत. या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना ताब्यात घेतल्यानंतर शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांना अटक करण्यात आली आहे.

गरुड यांच्या संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीचे प्रस्ताव बनावट असल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी नाशिक पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यानंतर गुरुवारी या पथकाने शेंदुर्णी येथील संजय गरुड यांच्या संस्थांना भेट देऊन महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांना सोलापूर येथून एसआयटीच्या नाशिक पथकाने ताब्यात घेतले. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्यानंतर भाजप नेते गरुड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बनावट शालार्थ आयडी या संस्थेतील असल्याचे तपासात आढळून आल्यानंतर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शेंदुर्णीनंतर चाळीसगावच्या संस्था रडारवर

जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतानाही बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच पाचोरा, पारोळा, अमळनेर व चाळीसगाव तालुक्यातील संस्थांमधील उर्वरित ८२ शालार्थ आयडी बनावट असल्याचा संशय असून, एसआयटीकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या तालुक्यांतील मोठ्या शैक्षणिक संस्था रडारवर आल्या आहेत.

Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

संस्थेच्या सहसचिवांची चौकशी करत तिघांना घेतलेय ताब्यात

एसआयटीने संजय गरुड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यांचीही चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कागदपत्रे नाशिक पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत. सहसचिवासह अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले.

Jalgaon News: जळगावात आदिवासीच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री अॅक्शन …

आता कोणाचा नंबर, अनेकांमध्ये पसरली धास्ती

संजय गरुड यांच्या अटकेनंतर तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. एसआयटीच्या कारवाईनंतर काही अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे एसआयटीकडून पुढील कारवाई सुरू आहे.

 

Web Title: 259 suspicious shalarth ids found in jalgaon district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Jalgaon
  • Latest Marathi News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी
1

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी

Sachin Ahir: इंजिनिअरिंग प्रवेशाचा खर्च वाढला! मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी
2

Sachin Ahir: इंजिनिअरिंग प्रवेशाचा खर्च वाढला! मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी
3

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या
4

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.