3 prisoners escape from Amravati Central Jail He broke the lock of the barracks in a filmy style and escaped across a 20 feet wall
अमरावती : अमरावती मध्यवर्ती कारागृहातून (Amravati Central Jail ) फिल्मी स्टाइलमध्ये बॅरेक क्रमांक १२ चे कुलूप तोडत २० फुट उंच भिंत ओलांडत ३ कैदी (3 prisoners) मंगळवारी (२८ जून) पहाटे २.३० वाजता पळाले. पळून गेलेल्या (Ran away) कैद्यांमध्ये हत्येचा प्रयत्नात आजन्म कारावासाची शिक्षा (Life imprisonment) भोगत असलेला साहिल अजमत कळसेकर (Sahil Azmat Kalsekar) (३३,नायसी, चिपळून, रत्नागिरी) (कैदी नं. ६०६५), अत्याचार प्रकरणात न्यायीक बंदी रोशन गंगाराम उईके (Roshan Gangaram Uike) (२३, बाळापेठ, शेंदूरजनाघाट वरूड) (न्यायिक नं. ५१९) तसेच सुमित शिवराव धुर्वे (Sumit Shivrao Dhurve) (१९, बाळापेठ, शेंदूरजना घाट वरूड) याचा समावेश आहे.
माहिती मिळताच फ्रेजरपुरा विभागाचे उपायुक्त एम. एम. मकानदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. त्याच प्रमाणे नागपूर पूर्व विभाग कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या पथकाने अमरावती मध्यवर्ती कारागृहात पोहोचत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. सोबत कर्तव्यावर तैनात जेल कर्मचारी, बॅरेक सुरक्षा रक्षक, प्रभारी कारागृह अधीक्षक कमलाकर मिराशे यांचे बयाण नोंदविले. कैद्यांचा शोध घेण्याकरिता ३ पथक गठीत करण्यात आले.