Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! मशीनच्या बेल्टमध्ये अडकून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; अंबरनाथमधील घटना

अंबरनाथच्या एमआयडीसीमध्ये एका कंपनीत ३ वर्षीय चिमुकल्याचा कंपनीतील मशीनच्या बेल्ट मध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2024 | 08:58 AM
धक्कादायक! मशीनच्या बेल्टमध्ये अडकून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; अंबरनाथमधील घटना (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

धक्कादायक! मशीनच्या बेल्टमध्ये अडकून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; अंबरनाथमधील घटना (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Follow Us
Close
Follow Us:

अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीमध्ये एका कंपनीत ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील मशीनच्या बेल्टमध्ये अडकून या 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. एमआयडीसीमधील राधे कृष्ण बेकर्स या कंपनीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेदेखील वाचा- दिवाळी आणि छठ पूजा उत्सवादरम्यान 28 फेस्टिवल स्पेशल ट्रेन धावणार! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व शहरातील आंनद नगर एमआयडीसीमधील राधे कृष्ण बेकर्स या कंपनीत आयुष चव्हाण या तीन वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आंनद नगर एमआयडीसीमध्ये राधे कृष्ण बेकर्स ही बिस्कीट बनवणारी कंपनी आहे. यामध्ये कामानिमित्त पूजा चव्हाण ही महिला आपल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन कंपनीत आली होती. मुलाला घरी सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने ती मुलाला सोबत घेऊन कामावर येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मात्र यावेळी तीन वर्षीय आयुष हा कंपनीत असतांना याच वेळी तो बिस्कीट बनवणाऱ्या मशीनजवळ पोहचला आणि काही क्षणातच तो मशीनच्या बेल्टमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेत चिमुकल्या आयुषला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा- राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वेच्या आंनद नगर एमआयडीसीमध्ये राधे कृष्ण बेकर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत ही दुर्दैवी घटना घडली असून आयुष चव्हाण या 3 वर्षीय चिमुकल्याने आपला जीव गमावला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. कंपनीतील मशीनच्या बेल्टमध्ये अडकून या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय आयुष हा कंपनीत असतांना बिस्कीट बनवणाऱ्या मशीनजवळ पोहोचला आणि काही क्षणातच तो मशीनच्या बेल्टमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. चिमुकल्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: 3 year old boy died after getting stuck in the company machine belt incident in ambernath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर
1

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख
2

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित
3

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध
4

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.