रोजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेला अनेक दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही. राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? असा सवाल आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेदेखील वाचा- दिवाळी आणि छठ पूजा उत्सवादरम्यान 28 फेस्टिवल स्पेशल ट्रेन धावणार! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती
अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माजी आमदार परशुराम उपरकर आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधित त्यांनी यासंबंधित त्यांनी बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन पत्र दिलं आहे. पत्रात म्हटलं आहे की, उपरकर माहितीच्या अधिकार येथे तक्रारी करुन आम्हाला नाहक त्रास देतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या प्रकरणात मला नाहक त्रास दिला जात आहे. याबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी.
परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची भुमिका कन्हैया पारकर यांनी घेतली आहे. ते कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत , राजू राठोड , समीर परब , विलास गुडेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, जर परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. पुतळा दुर्घटनेत पंतप्रधान , मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागीतली. मग कर्ता करविता या घटनेतील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड माफी केव्हा मागणार ? छत्रपतींचा पुतळा उभारण्यात आल्यावर सर्व अधिकाऱ्यांना, नेत्यांना माहिती होती. आजूबाजूला सौंदर्यीकरण, मजबुतीकरण, हॅलीपॅड ही कामे करण्यात येणार होती. त्याची माहिती अगोदरच सर्वगोड यांना होती. त्यांना एक विचारायचे आहे, ज्यापध्दतीने महनीय व्यक्ती येणार आहेत, त्यांना हॅलीपड करायचे आहे. त्यासाठी निविदा मागवल्या का? त्या लेवलची क्षमता असलेल्या ठेकेदरांची निविदा मागवल्या का?
हेदेखील वाचा- छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार ही माहिती होती. ती कामे तुकडे करून सोसायटी का दिली गेली, एवढी घाई का करण्यात आली? हॅलीपॅडप्रमाणे चांगला ठेकेदार का नेमला नाही? त्यामागचा उद्देश काय? सर्वगोड यांची माध्यमांमध्ये कात्रणे आहेत, ते स्वतः सर्व कामांचे श्रेय घेत आहेत, बांधकाम विभागाने जमीन हस्तांतरण केले. वास्तव असे आहे की, ज्या सोसायटीच्या नावे कामे आहेत, त्या सोसाटीयच्या एकाही मजुराने काम केलं नाही. सोसायटीच्या नावाने बेनामी ठेकेदारांनी कामे केली आहेत. सर्वगोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेवून सांगावे की, राजकोट किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे ज्या ठेकेदारांनी काम केले, त्याच ठेकेदारांनी पुतळ्याचे काम केले? जर सीसीटीव्ही फुटेज मिळत नसेल तर सॅटेलाईट वरुन फोटो घ्यावेत. त्या ठिकाणच्या प्रत्येक कामात सर्वगोड यांचा हस्तक्षेप होता, असा आरोप कन्हैया पारकर यांनी केला.
कन्हैया पारकर यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार म्हणून हॅलीपॅडचे काम चांगल्या ठेकेदाराला देता. आणि छत्रपतींच्या पुतळ्याचे काम सोसायटींना देता. हे कुठल्या अधिकारात दिलं आहे? एकतरी सोसायटीचा कामगार होता का? हे सर्वगोड यांनी सांगावे, याची चौकशी शासनाने करावी. कार्यकारी अभियंता सर्वगोड उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. जर त्यांनी माहिती मागितली असेल आणि ती चुकीची असेल तर कायद्याने उत्तर द्या. 80 माहितीचे अधिकार अर्ज दाखल केले आहेत. पुतळा दुर्घटनेत सर्वांनी माफी मागीतली. मात्र सर्वगोड यांनी अद्यापही माफी मागितली नाही.
जिल्ह्यातील राजकारण काही असुदेत, पण एक शिवप्रेमी म्हणून परशुराम उपरकर यांचे आम्ही समर्थन करतो. सर्वगोड यांनी अशा प्रकारे धमकी देवू नये. जी काही समिती गठीत केली आहे, जो कोण शिल्पकार जयदीप आपटे आहे. कार्यकारी अभियंता, आपटे आणि चेतन पाटील यांचे संभाषण आणि सीडीआर चेक करा. काही नेत्याच्या जीवावर वरीष्ठ अधिकाऱ्यांना खिशात घालणारा हे सर्वगोड अधिकारी आहेत. सर्वात मोठा भ्रष्टाचार सर्वगोड यांनी केला आहे. या बांधकाम विभागात शेकडो कोटीची कामे अशाच पध्दतीने सर्वगोड यांनी केली आहेत. काम अगोदर आणि निविदा नंतर अशी पध्दत त्यांची आहे. त्यामुळे शासनाने कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची कसुन चौकशी करावी. या चौकशीत हस्तक्षेप नको म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली आहे.