Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games : महाराष्ट्राने पटकावले सर्वोत्तम राज्य विजेतेपद; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक गाठत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. महाराष्ट्राच्या संघाने सर्व राज्यांपैकी सर्वाधिक पदके जिंकणारे राज्य ठरले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 14, 2025 | 09:40 PM
38th National Games : महाराष्ट्राने पटकावले सर्वोत्तम राज्य विजेतेपद; उत्तराखंडात महाराष्ट्राचा जयजयकार

38th National Games : महाराष्ट्राने पटकावले सर्वोत्तम राज्य विजेतेपद; उत्तराखंडात महाराष्ट्राचा जयजयकार

Follow Us
Close
Follow Us:

हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे व्दिशतक झळकविणार्‍या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने आज गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य विजेतेपदाचा करंडक देण्यात आला. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रंगला. या दिमाखदार समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडका स्वीकारला.

पदतक्त्यात महाराष्ट्राचे दुसरे स्थान

यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी.टी. उषा, उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्या, महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख संजय शेटे, उदय डोंगरे, विठ्ठल शिरगांवकर उपस्थित होते. उत्तराखंडातील स्पर्धेत 54 सुवर्णांसह 71 रौप्य, 76 कांस्य अशी एकूण 201 पदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले. स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा राज्यातील संघांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला. अहमदाबाद, गोवा पाठोपाठ उत्तराखंड स्पर्धेत महाराष्ट्र देशातील संघांमध्ये अव्वल येण्याची ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केली आहे.

27 क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राची पदके जिंकण्याची कामगिरी
तब्बल 27 क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॉस्टिक्स सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत. महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

सर्वाधिक 201 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र एकमेव संघ

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक 201 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरला आहे, सर्वोत्तम संघाचा मानही आपण पटकविला आहे असे सांगून नामदेव शिरगावकर म्हणाले की , महाराष्ट्राच्या पदकविजेत्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सलग तिसर्‍यांदा राज्यांच्या संघात अव्वल स्थान संपादन केले आहे. देशात पुन्हा जय महाराष्ट्राचा जयजयकार होत असल्याचा आनंद मोठा आहे.

हेही वाचा : Lalit Modi : माजी IPL अध्यक्ष ललित मोदी सुंदर अभिनेत्रीसोबतच्या ब्रेकअपनंतर ‘या’ महिलेला करताहेत डेट; स्वतःच केले सर्व रहस्य उघड

Web Title: 38th national games 2025 maharashtra wins the best state title in 38th national games at uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • 38th National Games 2025
  • maharashtra
  • National Games
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
2

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
3

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
4

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.