iqbalsingh chahal
मुंबई – अंमलबजावणी संचालनालय (ED) म्हणजेच ईडीने कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज इक्बालसिंह चहल चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांची ईडी चौकशी आता संपली आहे.
राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता ?
चहल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी इक्बाल चहल यांनी केली आहे. चहल यांच्या या मागणीमुळे राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान इक्बाल सिंह चहल ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील निर्णय आणि कामे यांची माहिती असणाऱ्या फाईल्स सोबत घेतल्या होत्या. चहल यांची चौकशी 3 वाजता संपली.
काय म्हणाले इक्बालसिंह चहल ?
चौकशीनंतर इक्बालसिंह चहल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जून 2020 मध्ये शासनाने निर्णय घेतला आपल्याकडे पुरेसे बेडस नसल्याने जम्बो कोविड केअर सेंटर उभारावे. 10 अशे सेंटर्स आपण उभारले. त्यावेळी मनुष्यबळ नव्हते. लोनही उपलब्ध होत नव्हते. मनुष्यबळ पुरवण्यासाठी स्थायी समितीने ठरवले की, टेंडर न काढता महानगरपालिकेने कोटेशनने सर्व कारवाई पूर्ण करावी. असे ठरवण्यात आले होते.
काय आहे आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन ‘मॅनेजमेंट सर्व्हिस’ या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या निकटवर्तीय कंपनीवर कोरोना महामारीच्या काळात देण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारकडे या प्रकरणाची तक्रार केली होती.