Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

70% Quota Bhumiputra: जिल्हा बँकांमधील ७० टक्के जागा आता ‘भूमिपुत्रां’साठी राखीव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

70 Percent Quota Bhumiputra: राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या सर्व बँकांना आता नव्या धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 09, 2026 | 04:00 PM
Devendra Fadnavis, Maharashtra Politics,Fuel Saving,

Devendra Fadnavis, Maharashtra Politics,Fuel Saving,

Follow Us
Follow Us:

70 Percent Quota Bhumiputra: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत आता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, सहकार विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे संबंधित जिल्ह्यातील तरुणांना आपल्या जिल्ह्यातच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी भरतीतील ७० टक्के जागा राखीव असतील. उर्वरित ३० टक्के जागांवर इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना संधी दिली जाईल. पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करताना बँकांना या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Sanjeev Arora Arrested: पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा धक्का! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक

राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या सर्व बँकांना आता नव्या धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असून, शेजारील जिल्ह्यांतील उमेदवारांनाही ३० टक्के खुल्या कोट्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

ग्रामीण अर्थकारणाचा कणा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानल्या जातात. विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, तालुका सहकारी संस्था, शेतकरी पतसंस्था या बँकांशी जोडलेल्या असतात. पीक कर्ज वितरण, शेतीसंबंधी आर्थिक मदत आणि ग्रामीण बँकिंग व्यवस्थेत या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Sharad Pawar News: ‘रयत शिक्षण संस्थेला जागतिक दर्जा देणार!’ कर्मवीर पुण्यतिथी दिनी शरद पवारांचा मोठा संकल्प

मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक जिल्हा बँका भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता, वाढती थकबाकी, कर्जवाटपातील गैरप्रकार आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणीत आल्या आहेत. काही बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे या बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सरकारच्या नव्या निर्णयामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच जिल्हा बँकांमध्ये स्थानिक परिस्थितीची जाण असलेले कर्मचारी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच सहकारी बँकिंग व्यवस्थेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी प्रभावी देखरेख यंत्रणा उभारण्याचीही गरज अधोरेखित होत आहे.

Web Title: 70 quota for locals in district cooperative bank recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • reservation

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’
2

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’

कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त; २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश
3

कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त; २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी
4

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.