Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sugar Factory Elections: छत्रपती कारखान्याचा कौल कुणाला? आज होणार मतमोजणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटच्या दोन दिवसांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रात प्रचार सभा घेऊन अनेक नाराजांना समजूत काढून त्यांना आपल्या बाजूने सक्रिय केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 19, 2025 | 09:42 AM
Chhatrapati Sugar Factory Elections: छत्रपती कारखान्याचा कौल कुणाला? आज होणार मतमोजणी
Follow Us
Close
Follow Us:

बारामती:  भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि १८) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीमध्ये ७४.७४ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ४५ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली असून सोमवारी (दि १९) मतमोजणी होणार असून या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत निवडणुकीचा कल लक्षात येणार आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीसाठी अ वर्गातून २२ हजार ७८२ तर ब वर्गातून ३२४ असे एकूण २३,१०६ एकूण मतदार आहेत, यापैकी ७४.७४ टक्के मतदान झाले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ७६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी आठ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघासाठी मतदान केले. यानंतर खताळपट्टा या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार , आई आशाबाई पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जो बायडेन गंभीर आजाराने त्रस्त; मोठमोठ्या नेत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानी माता पॅनल विरुद्ध कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, भाजप किसान मोर्चाचे नेते तानाजीराव थोरात, अविनाश मोटे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती बचाव पॅनेल अशी चुरशीची लढत झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटच्या दोन दिवसांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रात प्रचार सभा घेऊन अनेक नाराजांना समजूत काढून त्यांना आपल्या बाजूने सक्रिय केले. कारखाना कार्यक्षेत्रातील ७६ मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रिया बारामती शहरातील प्रशासकीय भवन मध्ये सुरू होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

RR vs PBKS : RR च्या ‘हे’ युवा खेळाडू घेणार भरारी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण,

Web Title: 7474 percent voter turnout for chhatrapati karkhana elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
2

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
3

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
4

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.