Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: 868 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर, सरपंच निवडही थेट मतदारातून होणार

अहिल्यानगर मधील 868 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. यातही 99 ग्रामपंचायतींच्या निवडणूक 2 वर्षांपासून झाल्या नाहीत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 11, 2025 | 08:59 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर मधील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबल्याचे दिसत आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नववर्षात जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ७६९ व मागील दोन वर्षापासून प्रशासक असणाऱ्या आणि निवडणुकीची प्रतिक्षा असणाऱ्या ९९ अशा ८६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २०२४-२५ वर्षातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे.

“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर मता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला

आता त्यात नवीन वर्षात फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्हाभरातील ७६९ ग्रामपंचायतींची पाच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या नगर पालिका निवडणुकीची आणि त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

सरपंच निवडही थेट मतदारांतून होणार

या सर्व निवडणुका ३१ जानेवारीअखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगासाठी हा कालावधी अपुरा आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्यांत मुदत संपणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती दिग्गज नेत्यांच्या गावातील आहेत. त्यामुळे येथेही राजकीय संघर्ष अटीतटीचा असतो. सरपंच निवडही थेट मतदारांतून होणार असल्याने भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याकडे रंगीत तालीम म्हणून पाहतात.

Sharad Pawar Dinner Night : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र

99 ग्रामपंचायती दोन वर्षापासून रखडल्या

जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपलेल्या ८४ ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. तसेच जानेवारी ते डिसेंबर २०२५ मधील मुदत संपलेल्या १४ ग्रामपंचायतीच्या देखील प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या ९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगोदर होतील. शिवाय काही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतरव २०२६ मधील ७६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Web Title: 868 gram panchayat elections postponed in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics

संबंधित बातम्या

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
1

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव
2

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा
3

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात
4

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.