Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातले 9 बडे नेते सोडणार महायुतीची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. अद्याप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नसली तर राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक दिग्गज नेते आता पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 03:45 PM
राज्यातले 9 बडे नेते सोडणार महायुतीची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  महायुतीत जागावाटपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल,त्याच पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. पण या फॉर्म्यल्यामुळे अनेक इच्छुकांच्या नाराजीलाही महायुतीतील पक्षनेतृत्त्वाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरल्याचीही बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले, कागलचे समरजित घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पडग्यामागे चर्चाही सुरू झाल्या आहेत.  दोन दिवसांपूर्वीच कागलच्या समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणाच्या तयारीत असून ते कोणत्याही क्षणी भाजप सोडून तुतारी हाती घेऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेदेखील वाचा:  ‘ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. अद्याप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नसली तर राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक दिग्गज नेते आता पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणार कागलचे समरजित घाडगे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच तुतारी हाती घेतली. त्यामुळे घाडगेंनी मोकळ्या करून दिलेल्या वाटेने आगामी काळात अनेक बडे नेते परतीच्या प्रवासाला लागतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतप्रवेश करू शकतात?

1.पुणे: पुणेजिल्ह्यातील इंदापूर विधानसभेतून अजित पवारांच्या गटाचे आमदार  दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवणे किंवा हातात तुतारी घेणे हो दोन पर्याय ठेवले आहेत.

हेदेखील वाचा: कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा विद्यार्थी, नोकरदारांना मोठा झटका; नवे निर्बंध लागू

2. पुणे: पुण्यातील वडगाव शेरीचेय माजी आमदार आणि भाजप नेते बापू पठारेंची काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे पुण्याचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

3. सातारा: खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले हेदेखील तुतारी हातात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या घरी जाऊन  भेट घेतली होती. त्यामुळे विधानसभेत मकरंद पाटलांच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

4. फलटण: फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठींब्यावर निवडणून आलेले आमदार दीपक चव्हाण हेदेखील केव्हाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा:  तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्…, पुण्यातील धक्कादायक प्रकार

5. सांगोला विधानसभा मतदारसंघातूनशिंदे सेनेच्या शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून निश्चित मानली जात आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील हेदेखील शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात.

6. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील  तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे.

7. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याही नाराजीचा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे तेही माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.

8. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्याही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्याशी गाठी-भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे शिंदे हेदेखील शरद पवाराकडे जाण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा: हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीला; पक्षांतराच्या घडामोडींना वेग?

9. विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हेदेखील कधीही हातात तुतारी घेऊ शकतात. तसे झाल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कागलचे समरजित घाडगे यांनी भाजपची साथ सोडच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हेदेखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी राहुल देसाईंनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्यासाठी राजीनामा दिला होता.

 

 

Web Title: 9 big leaders of the state will leave the alliance will join sharad pawar party nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Legislative Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
4

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.