Photo Credit- Team Navrashtra
पुणे: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पडद्यामागील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. ते शरद पवाप यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. या चर्चांदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधली बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटीलभाजपचे कमळ सोडन राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. त्यांच्या आजच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या नेमकं काय बोलणं झाले हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा: हर्षवर्धन पाटील वेगळा मार्ग निवडणार?; इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, इंदापूर विधानसभेतून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक असल्याचे सांगितले जाते. पण ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला तिकीट मिळणार असल्याचे सुत्र महायुतीने ठरवले आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून याठिकाणी दत्तात्रय भरणे आमदार आहेत. महायुतीच्या नव्या फॉर्म्यल्यानुसार ही जागा अजित पवार यांच्याच वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच वेगळा मार्ग निवडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने यावृत्ताला जणूकाही दुजोराच मिळाला आहे. असे बोलले जात आहे.
हेदेखील वाचा: इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांचे बंड अटळ?; अपक्ष लढणार की तुतारीसोबत जाणार?