Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचाकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2025 | 07:30 PM
नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यासंदर्भात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रही लिहले आहे. पालिकेच्या एफ \नॉर्थ विभागात आयोजित केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमीळ सेल्वन उपस्थित होते.

‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधावा अशा सूचना मंत्रिमंडळातील सदस्यांना केल्या आहेत. त्यानुसार मंत्री मंगलप्रभात लोढा यांचाकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअनुषंगाने सायन कोळीवाडा मतदार संघातील एफ /उत्तर विभागात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत अनेक अडचणींचा पाढा वाचला. शौचालयांचा तीस वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी पद्धतीने शौचालये चालवत असून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

अनेक ठिकाणी गळके छत, अस्वच्छ शौचालये , नादुरुस्त दरवाजे तसेच दिव्यांचीही सोय नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या अडचणीची मंत्री लोढा यांनी तातडीने दखल घेतली. तसेच यासंदर्भात त्यांनी उपस्थित महापालिकेचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर यांना या संबंधी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

सायन -कोळीवाडा मतदार संघात असलेल्या एफ /उत्तर या विभागात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना एकाच छताखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवादरम्यान रस्ते दुरुस्ती ,पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री लोढा यांनी वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार तामिळ सेल्वन यांनीही त्यांच्या मतदार संघात जनता दरबार आयोजित केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार व्यक्त केले.

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका

Web Title: A 30 year contract system for toilets should be abolished for the convenience of citizens as instructed by mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • BMC
  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.